भोकर येथे संगणक परिचालकांचे बेमुदत काम बंद आंदोलन

abhishek bakkewad
1 Min Read
Spread the love

भोकर ता. प्रतिनिधी/

भोकर – तालुक्यातील पंचायत समितीचे संगणक परिचालक यांचे विविध मागण्यासंदर्भात मागील अनेक दिवसापासून वरिष्ठाकडे तक्रार करून या तक्रारीची दखल वरिष्ठांनी घेत नसल्यामुळे डे मुदत काम बंद आंदोलन करण्यात येणार आहेत. गटविकास अधिकारी यांना दिलेल्या निवेदनात सध्या स्थितीत ग्रामविकास विभागास जिल्हा परिषदे कडून प्राप्त झालेल्या अभिप्राय आधारे ग्रामपंचायत च्या सुधारित आकृतीबंधाची फाईल वित्त विभागास त्वरित पाठवून संगणक परिचालकांना कर्मचारी दर्जा व किमान वेतन देणे, संगणक परिचालकांना सुधारित आकृतीनुसार कर्मचारी दर्जा किमान वेतन मिळेपर्यंत वीस हजार रुपये मासिक मानधन देणे व नव्याने सुरू केलेले चुकीची टारगेट सिस्टीम रद्द करणे, पंचायत समिती व जिल्हा परिषदेच्या जुन्या संगणक परिचालकांना नियुक्त केले पाहिजे व ज्यांची नियुक्ती झाली आहे त्यांना मागील सात महिन्यापासून मानधन मिळाले नाही. त्यांना त्वरित मानधन अदा करण्याची मागणी करण्यात आली आहे. यावेळी निवेदन देताना संगणक परिचालक संघटनेचे अध्यक्ष विष्णू राठोड उपाध्यक्ष स्मिता चौदंते , सचिव संजय ढवळे पाटील, सदस्य योगेश दोंतीवार, संतोष खांडरे, प्रकाश सायनवार, प्रवीण राठोड, शिवाजी मेटकर, तुळशीराम पप्पुलवाड, संतोष खंडेलोटे, सुनील जाधव यांच्यासह अनेक संगणक परिचालक उपस्थित होते.

TAGGED:
Share This Article
error: Content is protected !!