नायगाव ता प्रतिनिधी/अशोक वाघमारे.
नायगाव तालुक्यातील कुंटूर सर्कल अंतर्गत येणारा हुस्सा ते डोंगरगाव रस्त्याचे काम अति निकृष्ट दर्जाचे होत असून कामाकडे मात्र प्रशासनाचे मोठे दुर्लक्ष असल्याचे दिसून येत आहे.हुस्सा व डोंगरगाव रस्त्यासाठी जिल्हा नियोजन समितीकडून एक कोटी 60 लक्ष रुपयांचा निधी मिळाला असून हा निधी गेल्या अनेक वर्षापासून हुस्सा गावकऱ्यांसाठी मोठ्या प्रतीक्षात होता पण जिल्हा नियोजन समितीने सदर रस्त्यासाठी एक कोटी 60 लक्ष रुपयांचा निधी निधी देऊन हुस्सा वाशी यांना मोठा न्याय देण्याचे काम केले आहे मात्र यात कॉन्टॅक्टदार यांच्याकडून कामाची सारवा सरव करून कामात मोठा भ्रष्टाचार होत असल्याचे चित्र एकंदरीत दिसून येत आहे. सदर गुत्तेदारांना संबंधित इंजिनिअर यांचे मोठे पाठबळ असून त्यांच्या संगनमताने सदर रस्त्याच्या कामात निकृष्ट दर्जाचे मटेरियल वापरून कामाची कुठलीच मजबुतीकरण होत नसल्याचे चित्र दिसून येत आहे. या रस्त्यासाठी कुठल्याच प्रकारचा मुरूम व योग्य मटेरियल चा वापर होत नसून आणि रस्त्याचे मोजमाप न करता व रस्त्याची योग्य जागा ताब्यात न घेता कामास सुरुवात करून इंजिनिअर यांच्याकडून मात्र सदर कामाची माहिती दिली असता त्यांच्याकडून मात्र उडवा उडवी चे उत्तर व मोठ्या प्रमाणात वेळ काढून पणा होत असल्याचे दिसून येत आहे.
हुस्सा गावकऱ्यांसाठी एकमेव रस्ता असलेला हुस्सा ते डोंगरगाव हे रस्ता गेल्या अनेक वर्षापासून चिखलमय व गिट्टीचे साम्राज्य असल्याने गेल्या अनेक वर्षापासून हुशार गावकऱ्यांसाठी रस्त्यावरून जात असताना मोठी कसरत करावी लागत असं आणि रस्त्यावरून जात असताना रस्त्यावरील खड्ड्यांचा मोठा सामना करावा लागत होता पण जिल्हा नियोजन समितीने गावाची दखल घेत गावाच्या रस्त्यासाठी एक कोटी 60 लक्ष रुपयांचा निधी मिळून देण्यात मोठे योगदान असल्याचे देखील गावकऱ्याकडून सांगण्यात येत आहे मात्र इंजिनिअर व कॉन्ट्रॅक्टदार यांच्याकडून कामात हलगर्जीपणा करून काम मात्र निकृष्ट दर्जाचे करीत आहे असे सबंध गावकऱ्यांच्या वतीने सांगण्यात येत आहे. गावकऱ्यांनी याबाबतची माहिती वारंवार इंजिनिअर यांना दिली असता निर्णय मात्र सदर कामावर कुठल्याच नियंत्रण न ठेवता कामाकडे मोठे दुर्लक्ष केल्याचे सांगण्यात येत आहे. म्हणून आता हुस्सा ते डोंगरावर रस्त्याचे काम मजबूत करून देण्याची मागणी गावकऱ्याकडून होताना दिसून येत आहे. काम मजबूत नाही झाल्यास त्याची तक्रार वरिष्ठाकडे करून संबंधितावर योग्य ते कारवाई करण्यात येत असा इशारा देखील देण्यात आला आहे.