बिलोली तालुक्यात अवकाळी पावसाने रब्बी पिकाचे मोठे नुकसान.

abhishek bakkewad
2 Min Read
Spread the love

 

जिल्हा प्रतिनिधी नांदेड/अशोक वाघमारे 
नांदेड – बिलोली तालुक्यात गेल्या दोन दिवसापासून ढगाळ हवामान व विजेच्या कडकडात वादळ वाऱ्यासह झालेल्या अवकाळी पावसाच्या तडाख्याने रब्बी हंगामातील हरभऱ्याचे तुर भात पी कापूस व बागायती पिकासह अशा अनेक पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे या पिकाचे पंचनामे करून नुकसान भरपाई देण्याची मागणी आता होताना दिसून येत आहे.
तालुक्यात आरळी सावळी कोल्हापूर नागापूर अर्धापूर डोंगर कवठा हरणाळी हुनगुंदा गंगा बेळकोणी गोळेगाव सगरोळी आदमपूर अनेक भागात गेल्या काही दिवसापासून ढगाळ वातावरण व 27 व 28 नोव्हेंबर रोजी विजेच्या कडकडासह झालेल्या अवकाळी पावसामुळे अनेक पिकांचे नुकसान झाले आहे ढगाळ वातावरणामुळे फुलल्यावर आलेल्या तूर पिकाला अळीचा प्रादुर्भाव होत असल्याने शेतकरी विविध औषधांचा फवारा करून हैराण झाले आहे त्यातच या अवकाळी पावसाच्या तडाख्याने वेचणीला आलेला कापूस आणि कापणीला आलेले भात पिकांचे नुकसान मोठ्या प्रमाणात झालेले आहे पावसामुळे रब्बी रब्बी हंगामातील ज्वारी पिकाला जीवनदान मिळाले असले तरी तालुक्यात इतर पिकापेक्षा सर्वाधिक लागवड असलेल्या हरभरा पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे कारण हरभरा पिकांची पेरणीपूर्व व पेरणीनंतर पाऊस न झाल्याने पिके मारण्याच्या मार्गावर असताना काही शेतकरी आपापल्या सोयीनुसार पाण्याची व्यवस्था करून पिकाला जीवनदान दिले पण दोन दिवसापासून चालू असलेल्या या अवकाळी पावसाच्या तडाख्याने जमीन अति व ओलीताखाली जाऊन पिकाला बुरशी लागून मर रोग लागण्याची भीती वर्तवली जात आहे त्यामुळे शासनाने तात्काळ पंचनामे करून नुकसान भरपाई द्यावी अशी तालुक्यातील शेतकऱ्याकडून मागणी होताना दिसून येत आहे

Share This Article
error: Content is protected !!