हिमायतनगर ता.प्रतिनिधी/बाबाराव जरगेवाड
हिमायतनगर – तालुक्यातील महावितरण कर्मचारी यांच्या विविध मागण्यासाठी महा ऊर्जा मंत्री व स्थानिक आमदार माननीय माधवराव पाटील जवळगावकर यांना निवेदन देऊन चे कर्मचारी यांनी त्यांच्या विविध मागण्या करिता लाईन स्टॉप कर्मचाऱ्यांनी यांच्या वतीने निवेदन देण्यात आले असून सदर निवेदनातून येणाऱ्या हिवाळी अधिवेशनामध्ये महावितरण कर्मचारी लाईनस्टॉपच्या विविध मागण्या करिता माननीय आमदार माधवराव पाटील जवळगावकर यांनी आवाज उठवून आम्हाला न्याय देण्यात यावा व तो मागण्या पूर्ण करण्यात याव्या अशा प्रकारची मागणी एका निवेदनाद्वारे करण्यात आली आहे
सदर मागण्यासाठी भोकर विभागीय अध्यक्ष श्री साईनाथ कल्याणकर,सचिव श्री सचिन सोनसळे, हिमायत नगर उपविभागाचे अध्यक्ष श्री राजेश बक्केवाड, सोबत संदीप पिसाळ,एल.जी. बकवाड,परमेश्वर शिंदे, श्री उद्धव चरण ढगे , गजानन कल्याणकर धनंजय आडे महादेव मेटकर आधी उपस्थित होते.