एक्झिट पोल्सनंतर खासदार राहुल गांधी हे प्रचंड उत्साही दिसत आहेत.

abhishek bakkewad
1 Min Read
Spread the love

 

केरळ : पाच राज्यांच्या विधानसभा निवडणुकांचं मतदान पार पडलं असून मतदानोत्तर चाचण्यांचे कलही जाहीर झाले आहेत. यामध्ये काँग्रेसला या सर्व राज्यांमध्ये चांगलं यश मिळू शकतं त्यांचं सरकार स्थापन होऊ शकतं, असा अंदाज वर्तवण्यात आला आहे.

पण यामुळं काँग्रेस खासदार राहुल गांधी हे प्रचंड उत्साही दिसत आहेत. कारण केरळमध्ये एका कार्यक्रमात बोलताना त्यांच्यातील हा उत्साह दिसून आला.

राहुल गांधी यांनी यावेळी आपल्या २० वर्षांच्या राजकीय करियरची एका वाक्यात व्याख्या केली. गांधी म्हणाले, भारत जोडो यात्रेनं स्वतः स्लोगन तयार केली. मला आता याचं आश्चर्य वाटतं. कारण जर कोणी मला विचारलं की, माझं २० वर्षांचं राजकीय करियरची व्याख्या काय करणार. तर मी एकाच शब्दांत उत्तर दिलं असतं ते म्हणजे, “नफरत के बाजार में मुहब्बत की दुकान खोल रहा हूं”

TAGGED:
Share This Article
error: Content is protected !!