हिमायतनगर ता.प्रितीनीधी/बाबाराव जरगेवाड
हिमायतनगर : तालुक्यातील 52 ग्रामपंचायतींना इंटरनेट जोडून विविध प्रकारचे दाखले व ग्रामपंचायत स्तरावरील नमुने ऑनलाइन केले आहे. मात्र, हे काम करणाऱ्या संगणक परिचालकाला मानधनावर काम करावे लागत आहे. तालुक्यातील 29 संगणक परिचालक विविध मागण्यांसाठी बेमुदत संपात सहभागी झाले आहेत.
तालुक्यातील 52 ग्रामपंचायती ऑफलाइन झाल्या आहे. या ग्रामपंचायतीत 29 संगणक परिचारक कार्यरत आहे. मागील बारा वर्षांपासून ग्रामपंचायत स्तरावर ग्रामविकास विभागाने नेमून दिलेले कामे संगणक परिचालक करीत आहे. शासन त्यांच्या मागणीकडे दुर्लक्ष करीत असून, त्यांना मजुरापेक्षा कमी मानधन मिळते. ग्रामीण भागातील जनतेला विविध
सुधारित आकृतीबंधाची फाइलबाबत शासन प्रशासनाने अद्यापही निर्णय घेतला नसून संबंधितांची वेळ काढूपणा असल्याची भावना संगणक परिचालकांमध्ये आहे. महागाईच्या काळात अल्प मानधन दिले जात असून, तेही कधीच वेळेवर मिळत नाही.
मारोती नामदेव गाडेकर , तालुकाउपाध्यक्ष, संगणक परिचालक संघटना, हिमायतनगर
प्रकारच्या सेवा देण्याची काम संगणक परिचालक अविरतने करीत आहेत. ग्रामपंचायतचे ऑनलाइन-ऑफलाइन काम व इतर अनेक प्रकारची कामे प्रामाणिकपणे करूनही महागाईच्या काळात केवळ ६ हजार ९०० रुपये मानधन परिचालक देण्यात येते. संगणक संपावर गेल्यामुळे नागरिकांची कामे खोळंबली आहेत.