कुंटूर मंडळातील अनेक गावांमध्ये शेतामध्ये हरभरा व ज्वारी पिकावर करप्या रोग व अळ्यांचा सुळसुळाट

abhishek bakkewad
2 Min Read
Spread the love

 

जिल्हा प्रतिनिधी नांदेड/अशोक वाघमारे 
नांदेड – नायगाव तालुक्यातील कुंटूर मंडळ मध्ये अनेक गावांमधील शेतकऱ्यांच्या हरभरा पिकावर व ज्वारी पिकावर मोठ्या प्रमाणात करप्यारोग व रोगी आळींचा सुळसुळाट झाला असून शेतकऱ्यांचे यात आपण आतून नुकसान झाले आहे. या करप्या रोगामुळे शेतातील आलेले पीक हे मोठ्या प्रमाणात उद्ध्वस्त झाले असून शेतकऱ्यांना दुबार पेरणीची वेळ आल्याची दिसून येत आहे. खरीप हंगामातील पिके शेतातून झाल्यानंतर पावसाने मध्यंतरीच्या काळामध्ये मोठ्या प्रमाणात दांडी मारल्याने शेतकऱ्यांनी ओवाळीतच पेरणी केली असता यात काही शेतकऱ्यांचे पीक निघाले आणि काही शेतकऱ्यांचे पीक निघाली नसून शेतकऱ्यांना दुबार पेरणीसाठी सामोरे जावे लागले आहे. यात बहुतांश प्रमाणात अनेक शेतकऱ्यांचे पिकं निघालेल्या शेतामध्ये मोठ्या प्रमाणात रोगांचा व शिरकाव झाला असून या रोगामुळे शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाल्याचे दिसून येत आहे. सदर पिकामध्ये रोगांचे प्रादुर्भाव वाढल्याने रब्बी हंगामातील पिक हे मोठ्या प्रमाणात त्यांना व ज्वारी असून याच दोन पिकावर मोठ्या प्रमाणात रोगांचा प्रादुर्भाव होताना दिसून येत आहे यामुळे या पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाल्याचे दिसून येत आहे.
सदर पिकांवर मध्ये निसर्गाच्या ढगाळ वातावरणामुळे मोठ्या प्रमाणात उष्णताचे प्रमाण असल्याने जमिनीमध्ये असलेले पीक हे उष्णता मुळे व वरून असणाऱ्या रोगामुळे पिकांचे अतोनातून नुकसान आणि निघालेल्या हरभरा पिकावर मोठ्या प्रमाणात रोगी अळ्या यांचा प्रादुर्भाव झाल्याने शेतकऱ्यांमध्ये मोठी चिंता दिसून येत आहे या भागातील शेतकऱ्यांनी किमान दोन ते तीन वेळा फवारा करून देखील पिकामध्ये मात्र कुठलाच बदल होत नसल्याने शेतकरी मात्र मोठ्या चिंतेत. कुंटूर मंडळातील अनेक शेतकऱ्यांनी दुबार पेरणीसाठी समोर गेले असून या शेतकऱ्याने पुढे ऐन काळात दुबार पेरणीची वेळ आली असता शेतकऱ्यामध्ये मात्र यात मोठ्या प्रमाणात चिंताजनक वातावरण बघायला मिळत आहे. म्हणून संबंधित प्रशासनाने याकडे त्वरित लक्ष देऊन व झालेल्या नुकसानीचे पंचनामे करतील का अशा प्रकारची चर्चा आता शेतकऱ्यांमध्ये होताना दिसून येत आहे. आणि झालेल्या नुकसानीचे शासनाकडून मदत आम्हाला मिळेल का अशा पद्धतीची अशा शेतकऱ्यांकडून होताना दिसून येत आहे.

Share This Article
error: Content is protected !!