सुप्रीम कोर्टाच्या आदेशानुसार दुकानावरील इंग्रजी पाट्या काढून, मराठी पाट्या तात्काळ लावणे बाबत जिल्हाधिकार्‍यांस निवेदन. 

abhishek bakkewad
1 Min Read
Spread the love

 

देगलूर ता.प्रतिनीधी/

देगलूर – महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी महाराष्ट्रात बहुसंख्य समाज हा मराठी बांधव राहत असल्यामुळे आपली बोलीभाषा मराठी असून, दुकानावरील पाट्या बोर्ड मराठी भाषेतच असली पाहिजे अशी भूमिका साकारली होती. त्यानंतर सुप्रीम कोर्टाने महाराष्ट्रातील दुकानावरील पाट्या बोर्ड २३ नोव्हेंबर २०२३ पर्यंत मराठीतच लावण्याचे आदेश दिले असतांना परंतु देगलूर तालुक्यातील दुकानावरील लावलेल्या पाट्यामधील काही बदल दिसत नाही. यामुळे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने संपूर्ण महाराष्ट्रातील मराठी भाषेतील पाट्या लावण्याकरता आक्रमक भूमिका घेतलेली आहे. सुप्रीम कोर्टाचे आदेश पालन करून देगलूर तालुक्यातील व्यावसायिक दुकानदारांनी येत्या आठ दिवसाच्या आत मराठी भाषेत लावण्याचे प्रशासनाच्या वतीने आदेश निर्गमणित करून तात्काळ लावण्याची कार्यवाही करण्यात यावी. अन्यथा महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने दुकानावरील इंग्रजी भाषेतील फलक काढण्यात येथील व इंग्रजी बोर्ड फलकांना काळे फासण्यात येईल.

 

यावेळी प्रवीण मंगनाळे मनसे जिल्हाध्यक्ष, मनमंत परबते तालुकाध्यक्ष मनसे, काशिनाथ पाटील तालुका सचिव, विजय देसाई तालुका संघटक, श्रीकांत काळे मा. ता. अध्यक्ष, मोगलाजी पलपवार मनसे कार्यकर्ते, संगमेश्वर कुंटुरे मनसे तालुका उपाध्यक्ष, आकाश कंदीलवार मनसे कार्यकर्ते, चांद शेख मा. शहर संघटक, आजर शेख वाहतूक तालुकाध्यक्ष, सुभाष गायकवाड मनसे कार्यकर्ते, नागेश पलपवार मनसे तालुका उपाध्यक्ष आदींची निवेदनावर सह्यानिशी उपस्थिती होती.

Share This Article
error: Content is protected !!