बिलोली ता प्रतिनिधी/
बिलोली : कोळगाव ता बिलोली येथे रात्री बेरात्री अवैध वाळू उपसा होत आहे यात 4-5 हायवा व मशीन च्या साय्याने ही अवैध वाळू वाहतूक होत आहे. हे वैद्य रित्या वाळू गेले दोन ते तीन दिवसापासून सातत्याने वेळ साधून दिवसाढवळ्या तर रात्री बे रात्री मोठ्या प्रमाणात वाळू उपसा होत.कोळगाव येथील वाळू व्यावसायिक अखं शासनाशी अर्थिक व्यवहार करून ही वाळू उत्खनन होत आहे.
सदर वाळू ही शासनाच्या काही अधिकारी यांच पाठबल असल्याने ही वाळू उपसा होत आहे. सदर वाळू व्यावसायिक हे हम बोलें सो कायदा करके वाळू उपसा करीत आहे.अर्थात आमचं कोण वाकड करत नाही अशी वक्तव्य होत होताना दिसून येत आहे. वाळू व्यावसायिक यांनी शासनास न जुमानता अति जोमात ही गौन खनिज उत्खनन करीत आहेत. यात बिलोली येथील तहसीलदार , मंडळधीकारी, व तलाठी श्री सोनवणे यांचं मोठे पाठबल व आशीर्वाद असल्याने व संबंधित महसूल विभागाच्या अधिकाऱ्यांच्या आशीर्वादाने ही अवेद्यरित्या वळू उत्खनना होत आहे. सदर वाळू व्यवसायिक श्री हनुमंत हिंगणे, संजय पाटील हिवराळे, रणजीत पाटील हिवराळे, साहेबराव पाटील हिवराळे यासह गावातील अनेक वाळू व्यवसायिक यांनी संगनमताने शासनास आर्थिक तडजोडी करून अवैधरित्या वाळू उपसा ही रात्री बे रात्री मोठ्या प्रमाणात उपसा करीत आहेत. महसूल विभागातील अधिकारी तात्काळ लक्ष घालून वाळू त्वरित बंद करण्याची मागणी आता गाववाशीयाकडून होताना दिसून येत आहे. यामुळे शासनाचे खूप मोठ्या प्रमाणात महसूल बुडवत असून व गावातील सदर रोडवरील मोठे खड्डे पडत असून गावाचे खूप मोठ्या प्रमाणात नुकसान होताना दिसून येत आहे. सदर अवजड वाहतूक होत असल्याने रोडवर ऐन पावसाळ्यामध्ये खड्ड्याचे सावट दिसून येत आहेत. गोदावरी नदीचे पाणी वेळेवर सुटल्याने गोदावरी नदी ही अक्षरशः उघडी पडली आहे त्याचाच वाळू व्यवसायिकांनी फायदा घेत मोठ्या जोमाने ही वाळू उपसा करीत आहेत.
गावातून अवैधरित्या वाळू उपसा होत असलेली तात्काळ बंद करण्याची मागणी आता गाववाशीयाकडून होताना दिसून येत आहे.
कोळगाव येथे रात्री बे रात्री मशीन व हवाच्या साह्याने मोठ्या प्रमाणात अवैद्य वाळू उत्खनन होत आहे.