निवघा व तामसा येथे प्रत्येकी ३० खाटांच्या ग्रामीण रुग्णालयास मंजुरी आता रुग्णांना मिळणार आरोग्यसेवा

abhishek bakkewad
2 Min Read
Spread the love

हदगाव हिमायतनगर तालुक्याचे लोकनेते तथा जिल्हाप्रमुख बाबुराव कदम कोहळीकर यांची माहिती.

हदगाव ता.प्रतिनीधी/

हदगाव : निवघा व तामसा (ता. हदगाव) येथे स्त्री व पुरुष रुग्णांकरीता प्रत्येकी ३० खाटांचे ग्रामीण रुग्णालय उभारण्यात यावे याकरीता हिंगोली लोकसभा मतदारसंघाचे खासदार हेमंत पाटील व हदगाव हिमायतनगर तालुक्याचे लोकनेते तथा जिल्हाप्रमुख बाबुराव कदम कोहळीकर यांनी राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व आरोग्य मंत्री तानाजी सावंत यांच्याकडे सतत पाठपुरावा करत ही मागणी लावून धरली होती.

राज्याचे मुख्यमंत्री नामदार एकनाथ शिंदे यांनी विशेष बाब म्हणून निवघा व तामसा येथे प्रत्येकी ३० खाटांच्या ग्रामीण रुग्णालयास मंजुरी दिली असल्याची माहीती जिल्हाप्रमुख बाबुराव कदम कोहळीकर यांनी सांगितले आहे

 

निवघा (ता. हदगाव) या जिल्हा परिषद गटामध्ये बहुतांश खेडेगावे असून या भागात ग्रामीण रुग्णालय उभारले जावे, जेणेकरून या भागातील नागरीकांना योग्य प्रकारे आरोग्य सुविधा पुरविली गेली पाहीजे, या भागातील रुग्णांना तालुका अथवा जिल्हा स्तरावर जाऊन उपचार घेणे परवडणारी बाब नाही याकरीता जिल्हाप्रमुख बाबुराव कदम कोहळीकर यांनी वेळोवेळी प्रशासन व शासन यांच्या दरबारी या भागातील रुग्णांकरीता शासनाकडे निवेदने देत पाठपुरावाही सुरूच ठेवला होता. सोबतच तामसा येथे गेली अनेक वर्षांपासून प्राथमिक आरोग्य केंद्र असून या तामसा शहराला आजूबाजूची जवळपास ४० हुनही अधिक गावे जोडली गेली असून या भागातील नागरीकांनाही आरोग्य सेवेकरीता नांदेड गाठण्याशिवाय पर्याय नव्हता. या दोन्हीही मागण्यांना राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी विशेष बाब म्हणून मंजुरी दिली आहे.

नागरिकांकडून विशेष आभार

हदगाव व हिमायतनगर या दोन्हीही तालुक्यात मोठ्या प्रमाणात नागरीकांच्या समस्या असून या समस्या सोडविण्याकरीता आपण कटिबद्ध आहोत. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वातील सरकार असल्याने या सरकारच्या माध्यमातून केवळ लोकहीताची कामे हाती घेतली जात असून आपण ज्या काही मागण्या आजपर्यंत या सरकारकडे लावून धरल्या त्या सर्वच मागण्या टप्प्याटप्प्याने, एकेकाने आपण मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या मार्फत व खासदार हेमंत पाटील यांच्या माध्यमातून मार्गी लावत आहोतच. अनेक वर्षांपासूनची मागणी पूर्ण झाल्याने येथील ग्रामस्थांनी आभार मानले आहेत.

 

Share This Article
error: Content is protected !!