निम्न पैनगंगा प्रकल्पाला शेतकऱ्यांचा विरोध;गावठाण मोजणीसाठी आलेल्या पाटबंधारे विभागाच्या अधिकाऱ्यांना मोजणी न करताच फिरावे लागले माघारी

abhishek bakkewad
2 Min Read
Spread the love

(धरण विरोधी संघर्ष समिती तथा परिसरातील शेतकऱ्यांची आक्रमक भूमिका) 

माहूर तालुका प्रतिनिधी विजयसिंह हजारी

माहूर : निम्न पैनगंगा प्रकल्पसाठी गावठाण मोजणीसाठी आलेल्या पाटबंधारे विभागाच्या अधिकाऱ्यांना धरण विरोधी संघर्ष समिती तथा प्रकल्पग्रस्तांनी मोजणीस तिव्र विरोध केल्याने आज गुरुवार ०७ नोव्हेंबर रोजी मोजणी न करताच आल्यापाउली माघारी फिरावे लागले.

विदर्भ मराठवाड्यातील बहुचर्चित निम्न पैनगंगा प्रकल्प,या प्रकल्प क्षेत्रात विदर्भ-मराठवाड्यातील 95 गावे येत असून,सन 1997 मध्ये या प्रकल्पाला प्रशासकीय मंजुरात मिळाली होती,मात्र मंजुरी पासूनच या प्रकल्पाला शेतकऱ्यांचा कायम विरोध पाहायला मिळाला,मागील पंचवीस वर्षापासून हा प्रकल्प होऊ नये यासाठी 95 गावातील शेतकऱ्यांकडून अनेक मोठमोठी आंदोलने करण्यात आली,सध्या शासनाकडून या प्रकल्पाच्या कामाला मोठ्या प्रमाणात गती मिळाल्याने,बुडीत क्षेत्रातील शेतकरी,शेतमजूर आक्रमक झाल्याचे चित्र पाहायला मिळत आहे,मागील आठवड्याभरापासून या प्रकल्पाच्या विरोधात विदर्भ-मराठवाड्यातील 50 गावांमध्ये साखळी उपोषण, जलसमाधी आंदोलन,आणि कालपासून आमरण उपोषण चालू असताना पाटबंधारे विभागाच्या अधिकाऱ्यांनी पाठ फिरवल्याने पाटबंधारे विभागाविषयी शेतकऱ्यांमध्ये नाराजी व्यक्त केली, आज यवतमाळ जिल्ह्यातील आर्णी तालुक्यातील आयता व कवठा बुद्रुक येथे गावठाण मोजणीसाठी आलेल्या पाटबंधारे विभागातील अधिकाऱ्याकडून प्रकल्प क्षेत्रातील शेतकऱ्यांच्या जखमेवर मीठ चोळण्याचे काम करत असल्याचे शेतकऱ्याकडून बोलली जात आहे,शासनाकडून प्रकल्प क्षेत्रातील आयता व कवठा बु.येथे आज गावठाण मोजणी करण्यासाठी पाटबंधारे विभागातील अधिकारी येणार असल्याची बातमी परिसरातील शेतकऱ्यांना कळताच शेतकऱ्यांनी मोठी गर्दी केली होती,शेतकऱ्याकडून उमरी (काप)गावाजवळ गावठाण मोजणीसाठी आलेल्या पाटबंधारे विभागातील अधिकाऱ्यांचा ताफा अडविण्यात आला,त्यामुळे पाटबंधारे विभागातील अधिकाऱ्यांना गावठाण मोजणी न करताच माघारी फिरावे लागले,पैनगंगा हमारी माता है, इसके साथ हमारा जनम जनम का नाता है,जान देंगे लेकीन जमीन नही,अशा घोषणा देण्यात आल्या,यावेळी धरण विरोधी संघर्ष समितीचे प्रसिद्धी प्रमुख मुबारक तंवर, प्रल्हादराव गावंडे सर,उत्तम भेंडे,विजय समगीर,डॉ.मोरे,उत्तम मिराशेसह निम्न पैनगंगा प्रकल्प क्षेत्रातीत शेतकरी, शेतमजूर, तथा महिला भगिनी मोठ्या संख्येने उपस्थित होत्या.

TAGGED:
Share This Article
error: Content is protected !!