उमरा येथील पेवर ब्लॉकच्या निकृष्ट कामाची चौकशी करा एकनाथ मानकर यांचे मुख्य कार्यकारी अधिकारी मिनल करनवाल यांना निवेदन

abhishek bakkewad
2 Min Read
Spread the love

माहूर तालुका प्रतिनिधी विजयसिंह हजारी
माहूर – तालुक्यातील उमरा ग्रामपंचायत हद्दीत दलित वस्तीमध्ये करण्यात आलेल्या पेवर ब्लॉक कामाची व्हिडीओचित्रीकरणासह सखोल चौकशी करून दोषी कंत्राटदार, अभियंता आणि संबधित अधिकारी यांचे विरुद्ध कारवाई करण्याची मागणी वेळोवेळी निवेदन देऊन व प्रशासनाचे लक्ष वेधण्यासाठी रस्ता रोको आंदोलन करुनही गेंड्याची कातडी पांघरलेल्या प्रशासनाने केलीली नसल्याने याबाबतची थेट तक्रार जिल्हा परिषद नांदेड च्या मुख्य कार्यकारी अधिकारी मिनल करणवाल यांच्या कडे दि. ०७ नोव्हेंबर रोजी एका लेखी निवेदनाद्वारे एकनाथ मानकर यांनी केली आहे.

जगातील सर्वात मोठी लोकशाही, लोकतंत्र जेथे नांदते अशा भारत देशात वेळोवेळी ज्यावेळी प्रशासनातील भ्रष्ट आणि मुजोर अधिकाऱ्यांची अधिकारशाही जेव्हा जेव्हा आपले भ्रष्टाचारी राक्षसी प्रवृत्तीचे मुंडके वर काढते तेव्हा तेव्हा कोणीनाकोणी समाजसेवक,सामाजिक कार्यकर्ता त्याविरुद्ध आवाज उठवून भ्रष्टाचाराच्या राक्षसाचे मुंडके ठेवण्यासाठी,लोकशाही वाचवण्यासाठी लोकशाही मार्गाने आंदोलन करीत उभा राहतो.
याची प्रचिती माहूर तालुक्यातील उमरा या ग्रामपंचायत हद्दीत दलित वस्तीच्या पेवर ब्लॉकचे काम हे निकृष्ट दर्जाचे करण्यात आल्याच्या सामाजिक कार्यकर्ते एकनाथ मानकर यांनी जिप, नांदेडच्या मुकाअ मिनल करणवाल यांच्या कडे केलेल्या लेखी तक्रार निवेदनावरुन येत
आहे.करण्यात आलेल्या बोगस कामाची व्हिडिओ चित्रीकरणासह सखोल चौकशी करून सदरील काम करणारे दोषी कंत्राटदार,अभियंता व संबंधित अधिकारी यांचे विरुद्ध कठोर कारवाई करण्यात यावी या मागणीसाठी उमरा येथील सामाजिक कार्यकर्ते एकनाथ मानकर यांनी माहूर पंचायत समितीचे गटविकास अधिकारी सुरेश कांबळे यांना वेळोवेळी तक्रारीचे निवेदन दिले होते.परंतू, जाणिवपूर्वक या बोगस कामाची चौकशी करण्यात येत नव्हती.
त्यामुळे प्रशासनाचे या गंभीर बाबीकडे लक्ष वेधण्यासाठी मानकर यांनी दि.२८ नोव्हेंबर रोजी किनवट-माहूर रोडवर उमरा फाटा येथे रस्ता रोको आंदोलन केले असता त्यांना आश्वासन देऊन सुद्धा अद्याप याप्रकरणी कोणत्याही प्रकारची कारवाई झाली नसल्याने अखेर या प्रकरणी मानकर यांनी थेट नांदेड गाठत जिल्हा परिषदच्या मुख्य कार्यकारी अधिकारी मिनल करणवाल यांची भेट घेऊन या गंभीर प्रकरणाची भ्रष्टाचार कथा सांगून,सीईओ करणवाल यांनी प्रत्यक्ष जायमोक्यास भेट देऊन पेवर ब्लॉकच्या झालेल्या बोगस व निकृष्ट दर्जाच्या कामाची उच्चस्तरीय चौकशी करून संबधित भ्रष्ट अधिकारी,कर्मचारी कंत्राटदार यांचे विरुद्ध कठोर कारवाई करण्याच्या मागणीचे निवेदन मुकाअ.करणवाल यांना दिले आहे.

TAGGED:
Share This Article
error: Content is protected !!