श्री रेणुकादेवी मंदिरातील सुरक्षा रक्षकांकडून भाविकांना असभ्य वागणूक;

abhishek bakkewad
1 Min Read
Spread the love

सौजन्यपुर्ण वागणुकीचे प्रशिक्षण देण्यात यावे!- मनसेची मागणी

माहूर तालुका प्रतिनिधी विजयसिंह हजारी
माहूर : माहूरगडावरील श्री रेणुकादेवी मंदिरातील दर्शन गाभाऱ्यात कार्यरत असणाऱ्या पुरुष व महिला सुरक्षा रक्षकांना याठिकाणी मातेच्या दर्शनासाठी येणाऱ्या भाविकांशी सौजन्यपुर्ण
वागणूक देण्याचे प्रशिक्षण देण्यात यावे,अन्यथा मनसेच्या वतीने तीव्र आंदोलन करण्याचा ईशारा संस्थानचे अध्यक्ष,सचिव यांना दिलेल्या निवेदनातून महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने देण्यात आला आहे.

राज्यातील साडेतीन शक्तीपीठांपैकी एक कोट्यवधी भाविकांचे श्रध्दास्थान असलेल्या श्रीक्षेत्र माहुरगड येथील रेणुका मातेच्या मंदिरात कार्यरत असलेल्या महिला,पुरुष सुरक्षा रक्षकांकडून दर्शनासाठी येणाऱ्या भाविकांसोबत विशेषतः वयोवृध्द,ज्येष्ठ नागरिक,लहान मुले असलेल्या महिला भाविकांसोबत असभ्य वर्तवणुक केली जात असल्याने या ठिकाणी भाविकांच्या आस्थेशी खेळण्याचा प्रकार होत असल्याने या गैरप्रकाराबाबत महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने संस्थानचे अध्यक्ष,सचिव,
कोषाध्यक्ष,व्यवस्थापक यांना निवेदन देवून या सुरक्षा रक्षकांना भाविकांशी सौजन्यपुर्ण वागणुक देण्याचे प्रशिक्षण देण्यात यावे अन्यथा,भविष्यात असे प्रकार घडल्यास मनसेच्या वतीने तिव्र आंदोलन करण्याचा ईशारा दि. ०७ नोव्हेंबर रोजी निवेदनाद्वारे देण्यात आला आहे.

यावेळी मनसे जिल्हा उपाध्यक्ष नितीन मोहरे,मनविसे जिल्हा उपाध्यक्ष गजानन कुलकर्णी,
मनसे शहराध्यक्ष गणेश वर्मा, मनविसे शहराध्यक्ष मारूती भोपे,गोविंद तडेवार यांच्यासह मनसे,मनविसे पदाधिकारी,
मनसे सैनिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.निवेदनाच्या प्रतिलिपी तहसीलदार,पोलीस निरीक्षक यांनाही देण्यात आल्या आहेत.

TAGGED:
Share This Article
error: Content is protected !!