शेतकऱ्यांना सरसकट नुकसान भरपाई व मोफत बियाणे द्या!

abhishek bakkewad
2 Min Read
Spread the love

माहूर तालुका प्रतिनिधी विजयसिंह हजारी
माहूर – तालुक्यात अतिवृष्टी व अवकाळी पावसाने नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना सरसकट नुकसान भरपाई देण्यात येवून, दुबार पेरणीसाठी बियाणे मोफत देण्यात यावे,अशा आशयाच्या मागणीचे निवेदन माहूर तालुका भारतीय जनता पार्टीच्यावतीने तहसीलदार किशोर यादव यांना आज शुक्रवार दि.०८ नोव्हेंबर रोजी देण्यात आले.

माहूर तालुक्यात मागील काही दिवसात मोठ्या प्रमाणात अतिवृष्टी व अवकाळी पावसाने शेती पिकांचे खुप मोठे नुकसान झाले आहे.शेतकऱ्यांच्या रब्बी हंगामातील पिकाच्या पेरण्या पूर्ण होवुन जवळपास दिड महिना झालेला आहे.गत काही दिवसांपासून बेमोसमी अवकाळी पावसाने कापूस,तुर या दिर्घ पिकांसोबतच रब्बी हंगामातील गहू,हरभरा,तिळ,ज्वारी,मका तसेच फळबागा,भाजीपाला,
फुलबागा आदी पिकांचे मोठे नुकसान झाले आहे.पिकांवर ढगाळ वातावरणामुळे प्रचंड रोगराई पसरली आहे.यावर्षी माहूर तालुक्यात हरभरा पिकाची पेरणी मोठ्या प्रमाणात झाली आहे.हरभरा व गहू किंबहुना सर्वच पिकांना या अवकाळी पावसामुळे मोठा फटका बसला असून,खरीपाची जखम ताजी असतानाच रब्बी पिकेही हातची गेल्याने शेतकऱ्यांवर पून्हा एकदा दुबार पेरणीचे संकट ओढवले असल्याने शेतकरी हवालदिल झाला आहे.

झालेल्या नुकसानीचे पंचनामे करून संबंधित विभागाला त्याचे प्रस्ताव पाठवण्याचे आदेशीत करून सरसकट शेकऱ्यांना नुकसान भरपाई देण्यात यावी तसेच सर्व शेतकऱ्यांना हरभरा व गहू पिके जास्त पाण्यामुळे जळालेली असल्यामुळे दुबार पेरणी करिता हरभरा गहू पिकांचे बियाणे मोफत देण्यात यावे अशी मागणी माहूर तालुका भाजपाच्या वतीने माहूरचे तहसीलदार किशोर यादव यांच्या मार्फत राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे तथा उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या कडे माहूर भाजपाच्या वतीने करण्यात आली आहे.

यावेळी भाजपा माहूर ता.अ.
कांतराव घोडेकर,भाजयुमो जि.अ.संदीप राठोड,शहराध्यक्ष पुरुषोत्तम लांडगे,ता.सरचिटणीस अपील बेलखोडे,सो.मि.प्र.राहुल चव्हाण यांचे सह कार्यकर्ते उपस्थित होते.

TAGGED:
Share This Article
error: Content is protected !!