लोकतंत्र न्युज प्रतिनिधी/सुनिल शिंदे
नांदेड – परभणी येथे पार पडलेल्या माजी मंत्री ॲड. गणेशराव नागोराव दुधगावकर राज्यस्तरीय वक्तृत्व स्पर्धेत सुहानी उत्तम पवार या विद्यार्थिनीला उत्तेजनार्थ पुरस्कार मिळाला. नांदेडच्या वसंतराव नाईक महाविद्यालय शिक्षण घेत असलेल्या सुहानी उत्तम पवार हिचा या पुरस्काराबद्दल महाविद्यालयात सत्कार करण्यात आला.
प्रारंभी ही फक्त स्पर्धा ऑनलाईन घेण्यात आली. त्यात सर्वश्रेष्ठ ठरलेल्या नऊ स्पर्धकांची मंचावर अंतिम फेरीत वक्तृत्व स्पर्धा पार पडली. वसंतराव नाईक महाविद्यालयाच्या सुहानी उत्तम पवार या विद्यार्थिनीने या स्पर्धेत राज्यस्तरावर उत्तेजनार्थ पुरस्कार मिळवत महाविद्यालयाचा गौरव वाढवला. ५ हजार रुपये रोख, स्मृतिचिन्ह आणि प्रमाणपत्र असे या पुरस्काराचे स्वरूप होते.
महाविद्यालयाच्या वतीने प्राचार्य डॉ.शेखर घुंगरवार यांच्या हस्ते या पुरस्काराबद्दल सुहानी पवार हिचा सन्मान करण्यात आला. या प्रसंगी प्रा. डॉ. अनिल गच्चे, प्रा. डॉ. व्ही. आर. राठोड, भोकरच्या दिगंबरराव बिंदू महाविद्यालयातील प्रा. डॉ. जे. टी. जाधव, प्रा. डॉ. नागेश कांबळे, अधीक्षक आर.डी. राठोड आदींची उपस्थिती होती.