जिल्यातील जनता त्रस्त प्रशासन मस्त
नांदेड जिल्हा प्रतिनिधी:संजीवकुमार गायकवाड
नांदेड – नांदेड संचखड गुरुव्दारा शीख पंथीयांची काशी तीर्थक्षेत्र आहे. या परिसरात मोकाट कुत्र्याची भरमसाठ वाढ झाली आहे.रात्री च्या पहाटे पासून लाखो भाविक रोज गुरुव्दारा दर्शनाला येत असतात. प्रत्येक चौकावर असंख्य मोकाट कुत्रे नागरिक,व भाविकां यांना त्रास देत आहेत.चौथाळून भक्तांच्या आगावर जाऊन चावा घेत आहेत. भाविकांना रक्तभबाळ करून त्या नागरिकांना जखमी करीत आहेत.
त्यामुळे भाविक व नागरिक मोकाट कुत्र्यापासून भयभीत,त्रासून गेले आहेत. परंतु सदर मोकाट कुत्र्याचे कसलेही बंदोबस्त महानगर पालिकेतर्फे होत नाही.या बाबत नागरिकांत तिव्रसंताप व्यक्त होत आहे.जगप्रसिद्ध तीर्थस्थळ नांदेड गुरुव्दारा परिसरात महानगरपालिकाचे आत्यंत दुर्लक्ष झाले आहे. त्या करिता तीव्र नाराजगी व्यक्त होत आहे.
नांदेड वाघाळा महानगरपालिकेने ताबडतोब मोकाट कुत्र्याचा बंदोबस्त केले पाहिजे अशी नागरिकाची भावना व्यक्त होत आहे.अशी गुरुव्दारा परिसरातील जनतेची मागणी आहे.