….अन् अखेर पडसा पैनगंगा नदी पात्र पेंडावर समारोपीय जलसमाधी घेत आंदोलन मागे

abhishek bakkewad
2 Min Read
Spread the love

 

 

माहूर तालुका प्रतिनिधी विजयसिंह हजारी

माहूर – राज्य विधीमंडळाच्या नागपूर येथील हिवाळी अधिवेशना दरम्यान माहूर किनवटचे आमदार भीमराव केराम यांनी निम्न पैनगंगा प्रकल्प (चिमटा धरण) विरोधी संघर्ष समितीच्या पदाधिकाऱ्यांची राज्याचे उपमुख्यमंत्री तथा जलसंपदा मंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी भेट घालून मध्यस्थी करून सकारात्मक चर्चा घडवून आणली असता धरणासंबंधी पुन्हा बैठक लावण्याचे आश्वासन जलसंपदा मंत्री फडणवीस यांनी दिले अन् अखेर २८ नोव्हेंबर पासून माहूर तालुक्यासह आर्णी तालुक्यांमध्ये वेगवेगळ्या गावात धरण विरोधी संघर्ष समितीच्या माध्यमातून चालू असलेले विविध स्वरुपातील आंदोलन आज १५ डिसेंबर रोजी तात्पुरत्या स्वरुपात मागे घेण्यात आले असल्याची माहिती धविसं समितीच्यावतीने देण्यात आली आहे.

 

चिमटा धरण विरोधात धरणे आंदोलन,साखळी उपोषण,

जलसमाधी आंदोलन,आमरण

उपोषण या सारखी आंदोलने सतत चालू असताना राज्य विधिमंडळाच्या नागपूर हिवाळी अधिवेशनादरम्यान या संदर्भात धरण विरोधी संघर्ष समितीने जलसंपदा मंत्री फडणवीस यांच्या समोर काही मुद्दे मांडल्यानंतर धरणासंबंधी पुन्हा एकदा बैठक घेण्याचे आश्वासन देऊन आंदोलन थांबविण्याची विनंती फडणवीस यांनी केली.त्यामुळे धरणविरोधी संघर्ष समितीने विदर्भ मराठवाड्यातील यवतमाळ व नांदेड जिल्ह्यातील माहूर,किनवट,आर्णी,महागाव,

घाटंजी या तालुक्यातील ५० पेक्षा जास्त गावात सुरू असलेले आंदोलन तात्पुरत्या स्वरूपात स्थगीत केले.आंदोलन मागे घेत असताना आज माहूर तालुक्यातील पडसा येथील पैनगंगा नदीमध्ये समारोपीय जलसमाधी आंदोलन घेऊन या आंदोलनाची सांगता करण्यात आली.

 

यावेळी या जलसमाधी आंदोलनात मोठ्या संख्येने सहभागी झालेल्या गोकुळ,

वडसा,पडसा, कवठा बाजार येथील शेतकरी,शेतमजूर,

महिला,पुरुषांनी धरणाच्या संदर्भात वेगवेगळी गीते गात आपली मनोगतं व्यक्त केली.या जलसमाधी आंदोलनाला प्रकाश गायकवाड,माकप जिल्हा सचिव कॉ.शंकर सिडाम,डॉ.बाबा डाखोरे,प्रल्हाद चव्हाण,डॉ.शुभा डाखोरे,सुरेश गावंडे,अशोक दालपे,सुभाष डाखोरे,संजय मानकर यांनी संबोधित केले तर महिला प्रतिनिधी म्हणून नंदूताई बोक्से यांनी पण या धरणाच्या संदर्भात आपल्या व्यथा येथे मांडल्या.यावेळी संजय राठोड, प्रविण,संतोष रामेवार,गजानन डाखोरे,संदिप दुमपलवार सह मोठ्या प्रमाणात शेतकरी उपस्थीत होते .

TAGGED:
Share This Article
error: Content is protected !!