डॉ. कोमल यांचा व श्री सिद्धार्थ कांबळे यांचा जिल्हा होमगार्ड प्रशिक्षण केंद्र नांदेड येथे करण्यात आला सत्कार.
नांदेड प्रतिनिधी/गोविंद चिखलवाड
नांदेड – गृह रक्षक दलात असलेले बालाजी गोडबोले हे सुरक्षा रक्षक म्हणून हे काम करतात. त्यांनी सामाजिक बांधिलकी ही झोपली आहे .कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होताच त्यांनी हजर असतात. याच प्रमाणिकपणाच्या संस्कारात त्यांनी त्यांची कन्या कोमल यांना संस्कारित केले. कोमल लहानपणापासूनच अभ्यासात हुशार होती, तिचा कल पाहून बालाजी गोडबोले व तिच्या परिवाराने तिला उच्च शिक्षणासाठी प्रोत्साहन केले. मुलगी डॉ. व्हावी अशी तिच्या आई-वडिलांची इच्छा होती. त्यामुळे कोमल यांनी अफाट मेहनत केली. आर्थिक परिस्थिती बेताची पण बालाजी गोडबोले यांनी त्या परिस्थितीला सावरून तिची इच्छा पूर्ण करण्यास तिला शिकविले. बारावी परीक्षेला चांगले गुण मिळाल्यामुळे तिला सिईटी परीक्षेतून कोमल यांचा शासकीय वैद्यकीय महाविद्यालय येथे वैद्यकीय प्रवेश निश्चित झाला. 2017 यावर्षी डॉक्टर कोमल हिचे वैद्यकीय शिक्षण पूर्ण झाले आणि तिने वैद्यकीय शिक्षण पूर्ण करून त्या थांबल्या नाहीत . पदोत्तर पदवी मिळवण्यासाठी प्रयत्न सुरू केले. पदोत्तर पदवीचा खर्च परिवाराला जेपणारा नव्हता, म्हणून डॉ.कोमल यांनी स्वतः नोकरी करून त्यांनी अभ्यास सुरू केला . पदयूवीत्तर अभ्यासक्रम प्रवेशासाठीच्या नीट परीक्षेची त्यांनी तयारी सुरू केली. या परीक्षेत त्यांनी यश मिळवून त्यांनी वैद्यकीय शिक्षणातील जनरल मेडिसिन या विषयात त्यांनी एम.डी. पदवीत्तर पदवीही संपादित केली. जिद्दीने ध्येयगाटन्यासाठी सातत्य असेल तर परिस्थिती ही नव्हतं घेते हे डॉ. कोमल यांनी सिद्ध करून दाखविले. आपल्या गुणवत्तेच्या बळावर परिस्थितीतून मात करून यश मिळणारे फार कमी असतात. हे डॉ.कोमल यांनी दाखवून दिले. डॉ. कोमल व त्यांच्या परिवाराचा आणि श्री कांबळे यांचे चिरंजीव बी. टेक. केलेले श्री सिद्धार्थ कांबळे यांचा जिल्हा होमगार्ड प्रशिक्षण केंद्र नांदेड येथे सत्कार करण्यात आला यावेळी जिल्ह्याचे जिल्हा केंद्र नायक श्री अरुण परिहार सर सोबत तालुका समादेशक श्री प्रकाश कांबळे सर यांनी डॉक्टर कोमल व त्यांच्या परिवाराचां शाल व पुष्पगुच्छ देवून सत्कार करण्यात आला. यावेळी डॉ.पाटील सर, डॉ.बोंगुलवार सर, सिरसागर सर, बलबिर सिंग सर, मोबीन सर, जंकुट सर, अटकोरे सर, जोंधळे सर नितीन पंडित विजय अटकोरे , रविराज कोकरे ,कुळकर्णी मॅडम , छाया वाघमारे, बाराटे सर्व ग्रहरक्षक दलातील सर्व जवान हजर होते.