पेठवडज येथील गावात मातोश्री पानंद रस्त्यात अडथळा आणल्याने शेतकऱ्यांचे तहसीलदार कंधार यांना निवेदन…

abhishek bakkewad
2 Min Read
Spread the love

 

कंधार ता.प्रतिनिधी /कैलास शेटवाड
कंधार:-मोजे पेठवडज ता.कंधार जि. नांदेड येथील तरगळातील शेतकऱ्यांसाठी मातोश्री पानंद रस्ता जळबा गंगाराम डावकोरे ते सुरेश वडवळकर यांचे शेतापर्यंत पानंद रस्ते मधून मंजूर झाला असून त्यास तांत्रिक मान्यता क्र.13 दि.06.04 2023 व प्र.मा.क्र.दि.08/05/2023 व त्यास पंचायत समिती कंधार कडून काम करण्याची परवानगी दिल्यानंतर सदरील पानंद रस्त्याचे कामाचे हद्द करण्यात आले होते. तरी पानंद रस्त्यात येत असलेले काही शेतकरी जाणूनबुजून मनमानी करत अडथळा आणत आहेत कारण अडथळा आणत असलेल्या शेतकऱ्यांचा जमिनीचा सातबारा नसून ती जमीन तलावात अधिग्रहित,संपादित केलेली आहे असे निवेदनात नमूद केले आहे त्यामुळे जाणीवपूर्वक त्यांनी अडथळा आणत असल्याने सर्व शेतकऱ्यांचा हा अतिशय महत्त्वाचा रस्ता असल्याने शेतकऱ्यांच्या उत्पन्न व प्रगतीला अडथळा निर्माण होत आहे त्यामुळे आज दिनांक 18.12. 2023 रोजी सर्वच शेतकऱ्यांनी संतापून मा.तहसीलदार कंधार यांना सर्व शेतकऱ्यांचे वतीने सामूहिक निवेदन देण्यात आले तरी मा. तहसीलदार साहेब यांनी रस्त्याच्या आजूबाजूचे अतिक्रमण काढून देऊन सहकार्य करावे असे शेतकऱ्यांनी निवेदनाद्वारे विनंती केली आहे तसेच शेतकऱ्यांच्या प्रगतीचा रस्ता खुला करून द्यावा असे निवेदनात म्हटले आहे अन्यथा रस्त्याचे काम न चालू झाल्यास सर्व शेतकऱ्यांच्या वतीने तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा निवेदनात देण्यात आला आहे.तरी यावेळी निवेदन कर्ते मा.श्री.निळकंठ रावजी माधवराव मुगावे (सामाजिक कार्यकर्ते) व मा.श्री.भालचंद्र बापूसाहेब नाईक (शिवसेना उपजिल्हाप्रमुख नांदेड) व मा.श्री. गिरीधारी मोतीराम केंद्रे (माजी पंचायत समिती सदस्य प्रतिनिधी) व मा.श्री.दत्ता पोचिराम गायकवाड (सरपंच ग्रा.पं.का.पेठवडज प्रतिनिधी) तसेच मा.श्री.कैलास शेटवाड (माजी सरपंच पेटवडज) व श्री.दत्ता किनवाड,नागन बकवाड, सुनील राव डावकोरे,गोविंद रामतीर्थ बाबुराव ईर्षा शेटवाड, शैलेश बकवाड तातेराव बंडेवाड,परमेश्वर शेटवाड, भगवान शेटवाड,बालाजी मैलवाड आदींनी व सर्व शेतकऱ्यांच्या वतीने सामूहिक निवेदन देण्यात आले. यावेळी शेतकऱ्यांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती.

TAGGED:
Share This Article
error: Content is protected !!