निम्न पैनगंगा प्रकल्पाचे काम थांबेना अन् धरण विरोधी संघर्ष समिती अधिकाऱ्यांना गावात पाय ठेवू देईना

abhishek bakkewad
2 Min Read
Spread the love

धरण विरोधी समिती व शासन आमनेसामने

संघर्ष अधिक तीव्र होण्याचे संकेत

माहूर तालुका प्रतिनिधी/ विजयसिंह हजारी

माहूर – नांदेड व यवतमाळ जिल्ह्यातील बुडीत क्षेत्रातील गावात भुमी अभिलेख विभाग व पाटबंधारे विभागाच्यावतीने पुनर्वसन व गावठाण मोजणीचे वारंवार पत्र देऊन गावकऱ्यांना हैराण करन्याचे काम चालू आहे तर धरण विरोधी संघर्ष समितीच्या वतीने आक्रमक व प्रखर विरोध करीत अधिकारी व कर्मचाऱ्यांना हाकलून लावल्या जात असल्याने सध्या तरी बुडीत क्षेत्रातील वातावरण स्फोटक बनत असल्याचे चित्र पाहायला मिळत आहे.

निम्न पैनगंगा धरणविरोधी संघर्ष समिती विदर्भ मराठवाड्याच्या वतीने गेल्या 26 वर्षापासून निम्न पैनगंगा प्रकल्पाला तीव्र व आक्रमक आणि प्रखर विरोध करीत आहे ,

नुकतीच धरण विरोधी संघर्ष समितीने नागपूरच्या हिवाळी अधिवेशनात विविध पक्षाच्या राजकीय नेत्यांना धरण विरोधात निवेदन दिले तर राज्याचे उपमुख्यमंत्री तथा जलसंपदा मंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब यांची भेट घेऊन त्यांच्याशी चर्चा केली आणि फडणवीस साहेबांनी पंधरा दिवसानंतर या संदर्भात पाटबंधारे विभागाचे अधिकारी व धरण विरोधी संघर्ष समितीच्या लोकांची संयुक्तिक बैठक लावण्याचे समितीला आश्वासन दिले आहे .

अधिवेशनावरून धरण विरोधी समिती गावात पोहोचत नाही तर दोनच दिवसात पुन्हा मराठवाड्यातील सावरखेडा, नेर ( निंबायत) आणि बोंडगव्हाण या गावात भूमी अभिलेख कार्यालय माहूरचे अधिकारी गावठाण मोजणीसाठी पोहोचले तर इकडे खडका व आयता या गावात 19 डिसेंबर ला गावठाण मोजणी करण्याचे भुमी अभिलेख विभाग आर्णी यांचे पत्र आदल्याच दिवशी धरण विरोधी संघर्ष समितीच्या हाती पडल्याने, धरणविरोधी संघर्ष समिती आक्रमक झाली,

तिकडे मराठवाड्यातील तिन्ही गावातील धरण विरोधी मंडळींनी अधिकाऱ्यांना मोजणी न करू देता अक्षरशः हाकलून लावले तर इकडे आदल्याच दिवशी सर्व धरण विरोधकांची एकजूट करून 19 तारखेची खड्का व आयता येथे होणारी मोजणी हाणून पाडण्याचे जाहीर आव्हान व्हाट्सअप व फेसबुक वरून धरण विरोधी संघर्ष समितीने करताच भुमि अभिलेख व पाटबंधारे विभागाने दिनांक 19 डिसेंबर ची मोजणी रद्द केल्याबाबतचा निरोप धरण विरोधी संघर्ष समितीच्या पदाधिकाऱ्यांना दिला.

एकंदर पाहता कडाक्याच्या थंडीतही बुडीत क्षेत्रातील वातावरण या निमित्ताने गरमा गरम होऊ लागल्याचे चित्र पाहायला मिळत आहे.

TAGGED:
Share This Article
error: Content is protected !!