नांदेड जिल्ह्यातील 15 तालुका अध्यक्ष शरद पवारांचे संगती पण भोकर तालुका अजित दादा यांना पाठिंबा .

abhishek bakkewad
1 Min Read
Spread the love

भोकर ता. प्रतिनिधी:- गोविंद सूर्यवंशी

भोकर : मुंबई येथे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची महाराष्ट्र राज्याच्या कार्यकारिणीची एक महत्त्वपूर्ण बैठक वांद्रे येथील एमआयटी भुजबळ सिटी येथे ठेवण्यात आली होती राज्यभरातून हजारोंच्या संख्येने लोकप्रतिनिधी पदाधिकारी व कार्यकर्ते या बैठकीसाठी उपस्थित होते या सर्व प्रचंड जनसमुदायासमोर भोकर तालुका राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या सर्व सदस्यांनी एकमताने महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री माननीय अजित दादा पवार साहेब यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहण्याच्या निर्णय घेतला.
नांदेड जिल्ह्यातील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची आतापर्यंतची कामगिरी पाहता वेळोवेळी कार्यकर्त्यांना मा अजित दादा पवार यांनी मदत केलेली आहे बाकीचे कोणत्याही नेत्यांनी कार्यकर्त्यांच्या विचार केला नाही किंवा त्यांच्या कामांचा विचार केला नाही , महाराष्ट्र राज्याच्या प्रगतीसाठी व त्यापाठोपाठ भोकर तालुक्याच्या सर्वांगीण विकासासाठी माननीय अजितदादा यांनी भरपूर मदत करण्याचे आश्वासन सुद्धा कार्यकर्त्यांना दिले.
नांदेड जिल्ह्यातील भोकर तालुक्याने दादांना सर्वसामान्यांसाठी पाठबा देण्याचा निर्णय घेतल्याने मा अजितदादा यांनी सर्व कार्यकर्त्यांचे अभिनंदन केले व येणारा काळ हा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षासाठी सुवर्णकाळ ठरेल अशी आपली भूमिका स्पष्ट केली .
यावेळी नांदेड जिल्हा उपाध्यक्ष जवाजुद्दीन बरबडेकर , तालुकाध्यक्ष इंजिनीयर विश्वंभर पवार , शहराध्यक्ष डॉ फेरोज इनामदार , युवक तालुकाध्यक्ष गणेश बोलेवार , तालुका सचिव शेख रईस सह भोकर , उमरी , धर्माबाद , कंधार , तालुक्यातील असंख्य कार्यकर्ते उपस्थित होते.

TAGGED:
Share This Article
error: Content is protected !!