नागरिकांच्या आरोग्यासह मालमत्तेस गंभीर धोका!
माहूर तालुका प्रतिनिधी विजयसिंह हजारी
माहूर : राज्य परिवहन महामंडळ आगार माहूरच्या संरक्षक भिंती लगतच्या महात्मा फुले नगर मधील पत्रकार गजानन भारती यांच्यासह तब्बल ५० जणांच्या खासगी मालमत्तेत रा.प.म.माहूर आगार प्रमुख यांनी संडासाचे घाण पाणी व पावसाळ्यात वाहणारे पाणी जेसीबी मशीनचे सहाय्याने अनाधिकृत खोदकाम व बांधकाम करून सोडले असल्याने मालमत्ता धारकांसह परिसरातील रहिवाशी नागरिकांच्या आरोग्यास व मालमत्तेस धोका निर्माण झाला असल्याची तक्रार निरधारी जाधव यांनी माहूर तहसीलदार,
यांना दि.२१ डिसेंबर रोजी दिलेल्या लेखी निवेदनाद्वारे केली आहे.
राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे तालुकाध्यक्ष मेघराज जाधव, नगरपंचायत शिवसेना (उबाठा) गटनेत्या सौ.आशा जाधव, शिवसेना शहर प्रमुख निरधारी जाधव,पोलिस कर्मचारी खामनकर यांचेसह ५० जणांच्या खाजगी व नगरपंचायत माहूरचे मालकीच्या सार्वजनिक रस्त्यासह मालमत्तेत अनाधिकृतपणे पावसाळ्यातील पावसाचे पाणी, संडासचे आरोग्यास बाधा पोहोचवणारे घाण पाणी अनाधिकृतपणे सोडून राज्य परिवहन महामंडळ आगार प्रमूख माहूर यांनी दादागिरीचा कळस गाठला असल्याचे निवेदनात जाधव यांनी नमूद केले आहे.
निवेदनाच्या प्रति व प्रतिलिपी पालकमंत्री,जिल्हाधिकारी, सहाय्यक जिल्हाधिकारी, तहसिलदार,उपविभागीय पोलिस अधिकारी,पोलिस निरीक्षक, मुख्याधिकारी न.पं.माहूर, संपादक,आगार प्रमुख यांंच्या सह शिवसेना विधानसभा क्षेत्र प्रमुख ज्योतिबा खराटे यांना ज्ञानकल्पना प्रतिष्ठान राष्ट्रीय संघ अध्यक्ष निरधारी जाधव यांनी दिल्या असून, या गंभीर प्रकरणी लक्ष घालून तातडीने कायदेशीरपणे न्याय मिळवून द्यावा अशी विनंती वजा मागणी
आपल्या लेखी निवेदनाद्वारे त्यांनी केली आहे.