जिल्हा प्रतिनिधी नांदेड/अशोक वाघमारे
नांदेड – भोकर तालुक्यातील बेंद्री ता. भोकर येथे आम्ही वारकरी परिवार सेवाभावी संस्था महाराष्ट्र बोर्डाचे अनावरण व तालुक्यातील अनेक शाखा कार्यकारिणीची निवड व नियुक्तीपत्र वितरण सोहळा दि.29डिसे.2023 रोजी सकाळी 11.00 वाजता
संस्थेचे संस्थापक अध्यक्ष गुरुवर्य ह.भ. प. श्री राम महाराज पांगरेकर यांच्या व प्रमुख पाहुणे
म्हणुन संस्थेचे मार्गदर्शक रावसाहेब पाटील शिराळे, संस्थेचे उपाध्यक्ष गंगाधर हंबर्डे,सचिव -व्यंकटराव जाधव सहसचिव प्रभाकरराव पा. पुयड कोषाध्यक्ष शिवाजी मदमवाड
जिल्हाप्रसिध्दि प्रमुख चंपतराव डाकोरे पाटिल जि.प्र उपप्रमुख अशोकराव वाघमारे हुस्सेकर ,संस्थेचे सदस्य श्री प्रवीण रौतुलवाड,श्री गुलाबराव पा.उबाळे,श्री हरिनाम पा.कदम,श्री संतोष पा.कदम,श्री भगवान पा.रहाटीकर ,श्री त्रिमुख पा.येडके, नायगाव ता अध्यक्ष सोपान पा. गिरे ता सदस्य शंकर वाघमारे, किशोर वाघमारे प्रकाश वाघमारे सूर्यकांत वाघमारे यांच्या उपस्थितहा कार्यक्रम होणार असून.प्रारंभी कार्यक्रमचे दिप प्रज्वलन करून बोर्डाचे अनावरन भगवंताच्या नामघोषनेत उत्साहत झाले.व प्रमुख पाहुण्याचा गावकऱ्यांच्या वतीने सन्मानीय गुर्यवर्य मंडळीचे सत्कार समारंभ व तालुक्यातील नवनियुक्त पदाधिकारी यांना नियुक्ती पत्र देऊन त्यांचा सन्मान करण्यात येत आहे.
सदर कार्यक्रम हे ता. अध्यक्ष श्री शंकर देवकते व तालुक्यातील सर्व पदाधिकारी यांनी बेंद्री येथे आम्ही वारकरी परिवार सेवाभावी संस्था नांदेड च्या वतीने तालुकास्तरीय व शाखास्तरीय नवनियुक्त पदाधिकारी यांचं भव्य सन्मान सोहळा व नियुक्ती पत्र वितरण सोहळा आयोजित केला आहे म्हणून सदर कार्यक्रमासाठी भाविक भक्त मोठ्या प्रमाणात उपस्थित राहण्याचे विनंती देखील करण्यात आली आहे.
सदर कार्यक्रमाला संस्थेचे मार्गदर्शक ह. भ. प. श्री रावसाहेब पा शिराळे, संस्थापक /अध्यक्ष ह.भ.प. राम महाराज पांगरेकर, गंगाधर महाराज हंबर्डे, व्यंकट महाराज जाधव, प्रभाकर महाराज पुयड,शिवहार पा मदमवाड यासह जिल्ह्यातील व तालुक्यातील दिग्गज ज्ञानवंत गुणवंत मंडळी उपस्थित राहणार असल्याची माहिती संयोजक मंडळीकडून सांगण्यात आले आहे. तर आपल्या जीवनात अमुलाग्र बदल होण्यासाठी साधु संतांच्या सानिध्यात वावरण्यासाठी संत संग हाच खरा मार्ग आहे आणि जीवनामध्ये धार्मिक कार्य करण्यासाठी ज्ञानभक्ती आणि जीवन सुखकर करण्यासाठी भक्तिमार्ग फार महत्त्वाचाआहे म्हणून अशा महान प्रसंगी धर्माचे रक्षण करण्यासाठी गाव तिथे आम्ही वारकरी परिवाराची शाखा स्थापन करून भक्तीमार्गासाठि ईश्वर सेवेची आवड निर्माण व्हावी म्हणुन घर तिथे ग्रंथराज ज्ञानेश्वरी ग्रंथ मोफत देऊन पारायण आपल्या वेळेनुसार घरोघरी व्हावे म्हणुन महाराष्ट्रात सहा वर्षापुर्वी 42 भक्तानां आज सात हजार पाचशे भक्त जोडण्याचे काम संस्थेने केले, तर भविष्यात पांडुरंग माऊलींच्या दरबारी पंढरपुर येथे आम्ही वारकरी परिवार सेवाभावी संस्थेची धर्मशाळा व्हावी म्हणुन जमीन खरेदीसाठी सर्वांनी मदत करून संघटितपणे धर्मरक्षणासाठी संस्थेत सहभागी होण्याचे आवाहन संस्थापक अध्यक्ष ह भ प पुज्य गुरूवर्य श्री राम महाराज पांगरेकर यांनी केले भोकर तालुक्यातील सर्व आघाडीतील कार्यकारणी व शाखा कार्यकारणी पदाधिकारी याना नियुक्तीपत्र देऊन त्यांचा सन्मान करण्यात येत आहे.
या कार्यक्रमासाठी जिल्ह्यातील व तालुक्यातील सर्व आघाडी मुख्य आघाडी, प्रसिद्धी आघाडी, महिला आघाडी, युवक आघाडी,साधुसंत,भाविक भक्त मंडळी उपस्थिती राहणार आहे.
हा कार्यक्रम यशस्वि करण्यासाठिआम्ही वारकरी परिवार सेवाभावी संस्थेचे सर्व पदाधिकारी यांनी यां पवित्र कार्यक्रमाचा लाभ घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे.