शेतकऱ्यावर होणाऱ्या अन्याय गजानन पाटील चव्हाण खपवून घेणार नाही
नायगाव ता.प्रतिनिधी/अशोक वाघमारे
नायगाव – दिनांक 27/ 12 /2023 रोजी तहसील कार्यालय नायगाव येथे मा तहसीलदार नायगाव व मार्फत मा जिल्हाधिकारी नांदेड मा उपजिल्हाधिकारी बिलोली
यांना तक्रारी निवेदन अर्ज नायगाव तालुक्यासह नायगाव मतदारसंघातील सर्व शेतकरी बांधवांचे एसबीआय बँक, महाराष्ट्र ग्रामीण बँक, बी ओ आय बँक, सह अनेक बँकांनी शेतकऱ्यांचे प्रधानमंत्री सन्मान योजनेचे व पिक विमा व नुकसान भरपाई अशा सर्व अनुदान बँकांनी होल्ड केल्याने ते तत्काळ होल्ड काडण्यात यावे तसेच मा श्री एकनाथरावजी शिंदे, तथा देवेंद्रजी फडणवीस, अजित दादा पवार, यांच्या संयुक्त सरकारने सर्व शेतकऱ्यांची कर्जमुक्ती बाबत दखल घेऊन शेतकरी कर्ज माफीची 24 डिसेंबर 2023 रोजी घोषणा केली आहे त्यामुळे बँकांनी का हट्ट धरावा आणि शेतकऱ्यांचे का लुस्कान करावे हा मोठा केविलवाना प्रकार आपल्या सर्वांना पहावयास मिळत आहे म्हणून सर्व शेतकऱ्यांच्या वतीने नाईलाजस्तव अन्यथा तीव्र आंदोलन करण्याचे कारण होइल व शेतकऱ्यांच्या वतीने संबंधित प्रशासनास तक्रारी निवेदन करून मागणी केलेली आहे निवेदन देत असताना उपस्थित नायगाव तालुक्यासह मतदारसंघातील सर्व शेतकरी बांधव गोविंद पा मोरे, ज्येष्ठ मार्गदर्शक भाऊराव पाटील चव्हाण, नायगाव विधानसभा मतदारसंघाचे युवा नेतृत्व शेतकरी पुत्र गजानन शंकरराव पाटील चव्हाण, गुलाब पाटील सोमठाणकर, माधव पा मोरे, बालाजी वाडे, हौसाजी तोडेवाड, शंकर मोरे, अजित शेख, शिवाजी चव्हाण, बहिणाबाई मोरे, निकिता पवार, गजानन पवार, व्यंकट बच्चेवार, साईनाथ ईभित्वर, किशोर गायकवाड, तेजराव मोरे, गंगाबाई मोरेवाड, प्रयागबाई मोरे, पांडुरंग सोमवार, तुकाराम वाडेकर, महादेव वाडे, शंकर कोमलवार, खलील शेख, जयराम तोटेवाड, शिवाजी पुयाड, यासह सर्व शेतकरी बांधव मोठ्या प्रमाणामध्ये उपस्थित होते