हिंगोली लोकसभेवर महाविकास आघाडीचाच उमेदवार निवडून येणार !आ.रविंद्र वायकर यांची ग्वाही

abhishek bakkewad
3 Min Read
Spread the love

 

माहूर तालुका प्रतिनिधी विजयसिंह हजारी
माहूर : या मतदारसंघाचा लोकसभा खासदार ईडीच्या भितीने व आर्थिक अमिषापोटी पक्ष सोडून रणछोडदास बनला असून,त्याचा बदला तमाम शिवसैनिकांनी घ्यावा हा माननीय उद्धव ठाकरे यांचा संदेश घेऊन मी आई भवानी रेणुकामातेच्या प्रांगणात “गद्दार हटाव शिवसेना (उबाठा) चुनकर लाओ” असा नारा देत येत्या लोकसभा निवडणुकीत हिंगोली लोकसभा मतदारसंघात बाहेरचा उमेदवार लादला जाणार नाही व महाविकास आघाडीचाच उमेदवार निवडून येईल!अशी ग्वाही शिवसेना नेते आमदार रवींद्र वायकर यांनी दिली.

किनवट माहूर विधानसभा मतदारसंघातील शिवसेना पदाधिकारी व कार्यकर्त्यांचा मेळावा माहूर येथील शिवसेना कार्यालयाच्या प्रांगणात दि.२९ डिसेंबर रोजी आयोजित करण्यात आला होता.त्यावेळी शिवसेना नेते आ.रविंन्द्र वायकर यांनी शिवसेना स्टाईलने पदाधिकारी व कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करताना ते बोलत होते.

आघाडी ही काळाची गरज असून, या हिंगोली लोकसभा मतदारसंघात महाविकास आघाडीचा उमेदवार आणण्यासाठी शिवसेनेची संपूर्ण ताकद आम्ही पणाला लावणार आहोत.शासनाच्या तिजोरीत पैसेच नाहीत परंतु आश्चर्य म्हणजे सरकार मोठ मोठे प्रकल्पासाठी कोट्यावधीचा निधी आणल्याची भपकेबाज जाहिरातबाजी करीत आहे.कोटी सोडा पण लोट्यानेसुद्धा पैसा येणार नाही आणि परिणामी या प्रकल्पावर काम करणाऱ्या गुत्तेदारांवर विमनस्क होण्याची पाळी नक्कीच येणार असल्याचा घणाघात वायकर यांनी यावेळी बोलताना सत्ताधारी सरकारवर केला.
पुढे बोलताना ते म्हणाले कि, गद्दारांना त्यांची जागा दाखवून देण्यासाठी आघाडीतील उमेदवार हा जास्तीतजास्त मतांनी निवडुन आला पाहीजे यासाठी गद्दारांची राजकीय हद्दपारी करण्याची वेळ आलेली आहे.
आघाडीतील २८ विविध पक्ष मा. शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांच्यासोबत असल्याचे सांगत, तमाम कार्यकर्त्यांची प्रचंड शक्ती हीच शिवसेना आहे.यामुळेच हिंगोली लोकसभेवर आपलाच विजय निश्चित असल्याचा ठाम विश्वास वायकर यांनी यावेळी माहूरच्या देवभूमीत शिवसेना पदाधिकारी व कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करताना दिला.

ज्योतिबा खराटे हे या विधानसभा मतदार संघाचे गड राखणारे खरे शिलेदार व एकनिष्ठ शिवसैनीक असल्याचे वायकर यांनी बैठकित सांगितले.
यावेळी व्यासपिठावर संपर्कप्रमुख बबनराव थोरात,एकनाथराव पवार,
ज्योतिबा खराटे,माजी आ.नागेश पाटील आष्टीकर,सहसंपर्कप्रमुख दत्ता कोकाटे,बंडु खेडकर,
ता.प्र.उमेश जाधव,यश खराटे,
सुनिल कदम,जनाबाई डुडुळे,
,आदी उपस्थित होते.
या मेळाव्यात नागेश पाटील आष्टिकर,ज्योतिबा खराटे,उमेश जाधव यांनीही आपले मनोगत व्यक्त केले.मान्यवरांच्या उपस्थितीत अनेक नवयुवकांनी शिवसेनेत पक्ष प्रवेश केला.तर यश खराटे यांनी युवासेना पध्दधिकारी जाहीर करून मान्यवरांच्याहस्ते नियुक्ति पत्र प्रदान केले.
नांदेड जिल्हा संपर्कप्रमुख बबनराव थोरात यांनी किनवट माहूर विधानसभा मतदारसंघात विशेष लक्ष देण्याची खराटे यांची मागणी उचलून धरत मतदार संघात झुकते माप देण्याचे त्यांच्या वतीने मागणी केली. आगामी लोकसभा निवडणुकीत अधिक मताधिक्य देऊ असा विश्वास ज्योतिबा खराटे यांनी व्यक्त वरिष्ठांना दिला.सूत्रसंचालन प्रा.विनोद कांबळे तर प्रस्तावना जितु चोले यांनी केली.यावेळी किनवट ता.प्र.मारोती दिवसे,
किनवट शहरप्रमुख बाबू जाठवे,यश खराटे,सुनिल कदम,
जनाबाई डुडुळे,उपनगराध्यक्ष नाना लाड,नगरसेवक विजय कामटकर,अतुव दर्शनवाड, अनिल रूनवाल यांच्या सह माहूर किनवट विधानसभा मतदारसंघातील पद्धधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने अपस्थित होते.

TAGGED:
Share This Article
error: Content is protected !!