जितेंद्र आव्हाड यांना तात्काळ अटक करा असा हिंदुत्ववादी संघटनांकडुन यांच्या वक्तव्याचा जाहीर निषेध अटक करण्याची मागणी.

abhishek bakkewad
2 Min Read
Spread the love

 

भोकर प्रतिनिधी . गोविंद चिखलवाड

भोकर – राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे नेते जितेद्र आव्हाड यांनी श्री रामाबद्दल आक्षेपार्ह वक्तव्याचा निषेध व्यक्त करण्यासंबंधी हिंदुत्ववादी संघटना विश्व हिंदु परिषद बजरंग दल यांनी मुख्यमंत्री यांना तहसीलदार भोकर यांच्या मार्फत दि ४ जानेवारी रोजी निवेदन सादर केले आहे.

आगामी २२ जानेवारी रोजी भव्य श्री राम मंदिराचे लोकार्पण होणार आहे.समग्र देश भरात उत्सव साजरा होणार आहे.या अगोदर राजकीय लोकांकडून श्री रामाबद्दलचे आक्षेपार्ह वक्तव्य होताना दिसत आहेत.राष्ट्रवादी काँग्रेस चे नेते जितेद्र आव्हाड यांनी एका कार्यक्रमांत हिंदु धर्माचे आराध्य दैवत श्री रामाबद्दल आक्षेपार्ह वक्तव्य करुन हिंदु जनमानसाची भावना दुखविल्या आहेत अशा आशयाचे निवेदन मुख्यमंत्री तसेच उपमुख्यमंत्री

महाराष्ट्र राज्य यांना विहिंप बजरंग दल जिल्हा संयोजक पंजाब हुलगुंडे आणि गोरक्षा प्रमुख लक्ष्मणराव कोरंटलु यांनी आव्हाड यांच्यावर कायदेशीर करण्यास्तव उपविभागीय अधिकारी भोकर यांना दि.४ जानेवारी रोजी निवेदन सादर केले असुन निवेदनात जितेंद्र आव्हाड यांनी काल ३ जानेवारीला सर्व हिंदूचे आराध्य असलेल्या प्रभू श्रीराम यांना मांसाहारी संबोधून हिंदूंच्या श्रद्धा दुखावण्याचे केलेले काम अत्यंत निषेधार्ह आहे.भगवान श्रीराम हे सर्वासाठी पूजनीय आहेत,सर्वाचे श्रध्दास्थान आहे.

धर्मग्रंथात कोठेही प्रभूश्रीराम मासांहार करीत होते असे लिहिलेले नाही. हिंदूव्देष्टा जितेंद्र आव्हाड यांनी ठरवून देशभरातील रामनामाच्या संकिर्तनात बुडालेल्या हिंदूना प्रभूश्रीराम मांसाहारी होते हे विधान करुन संत महंत तसेच हिंदू समाजाला खूप दुखावले आहे.

आदर्श पुत्र आदर्श पिता आदर्श पती आदर्श भाऊ व आदर्श राजा असे सर्वच बाबतीत आदर्श असलेल्या प्रभू श्रीरामाचा अपमान करणाऱ्या हिंदूव्देष्टा जितेंद्र आव्हाड विरोधात गुन्हा दाखल करुन आटक करावी अन्यथा आव्हाडाच्या विरोधात विश्व हिंदू परिषद रस्त्यावर उतरेल याची नोंद घ्यावी असे सूचित केले आहे. निवेदनावर कारसेवक नरोजी पांचाळ, पवन चक्रावार,ओम श्रीपतवार, साई श्रीपतवार, सोमेश देशमुख, अमोल पोलादवार,मारोती कारलेवाड,ओम जाधव,आदिनाथ मँकलवाड यांच्या स्वाक्षऱ्या आहेत.

TAGGED:
Share This Article
error: Content is protected !!