[ १० महिणे उलटूनही वर्क ऑर्डर न भेटण्याचे कारण काय ? ]
उमरखेड ता.प्रतिनिधी /मनोज राहुलवाड
उमरखेड – विकासाच्या प्रतीक्षेत असलेले ढाणकी शहर, समस्यांचे माहेरघर बनले असून, शासन ढाणकी शहराकडे दुर्लक्ष का करत असावे? प्रशासन ढाणकीच्या विकासासाठी कधी पुढे येणार? असा प्रश्न ढाणकीकरांसमोर आ वासुन उभा आहे.
वैशिष्ट्यपूर्ण योजनेअंतर्गत ढाणकी नगरपंचायत ला अंदाजे २६ मार्च २०२३ रोजी १ कोटी ६५ लाखाच्या कामांचा निधी मिळाला. जवळपास दहा महिने उलटून गेले पण अजूनही, सदर १ कोटी ६५ लाखाच्या कामांसाठी वर्क ऑर्डर न भेटण्याचे नेमके काय कारण असावे? असा प्रश्न निर्माण होत आहे. सदर निधी हा नगरपंचायतने सार्वजनिक बांधकाम विभागाकडे वर्ग केल्याची माहिती आहे. परंतु सार्वजनिक बांधकाम विभाग ढाणकीच्या विकासाबाबत मात्र उदासीन दिसून येत आहे. कारण निधी येऊन दहा महिने उलटूनही, अजूनही वर्क ऑर्डर का दिल्या जात नसावी? या निधीमधून ढाणकी शहरातील बऱ्याच प्रभागातील रस्त्यांचा प्रश्न मार्गी लागला असता? आता नेमकं ही वर्क ऑर्डर केव्हा भेटणार? आणि ढाणकीतील १ कोटी ६५ लाखांची विकासात्मक कामे केव्हा होणार? या प्रतीक्षेत नागरिक असल्याचे बोलून दाखवत आहेत. सार्वजनिक बांधकाम विभाग ही बाब गांभीर्याने घेऊन, लवकरात लवकर वर्क ऑर्डर काढून सदर निधीची योग्य प्रकारे विल्हेवाट लावणार का? व ढाणकीच्या विकासास हातभार लावणार का? हे पाहणे औत्सुक्याचे ठरेल.