आमचे सरकार हे दिलेला शब्द पाळणारे असून आम्ही थेट जनतेत जाऊन काम करत आहो – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

abhishek bakkewad
1 Min Read
Spread the love

धनुष्यबाण’ आपलाच, फोटोग्राफी करण्यापेक्षा शेती करणं चांगलं; मुख्यमंत्र्यांचा ठाकरेंचा टोला

हिंगोली जिल्हा प्रतिनिधी/

हिंगोली – शिवसेनेचा धनुष्यबाण आपलाच असल्याचा पुनरुच्चार आमदार अपात्रता निकालाच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केला आहे. मुख्यमंत्री हिंगोली येथे बोलताना म्हणाले, मी नेहमीच कार्यकर्ता होतो आणि आताही कार्यकर्ताच आहे, असे सांगतानाच तुम्हा इतकी पोटदुखी का?, असा सवालही मुख्यमंत्र्यांनी ठाकरेंना यावेळी केला.

 

दरम्यान, हेलिकॉप्टरमधून गावी जाणारे गावी शेती करायला जातात या ठाकरेंच्या टीकेचा समाचार घेताना शिंदे म्हणाले, फोटोग्राफी करण्यापेक्षा शेती करणं केव्हाही चांगलंच असा हल्लाबोल त्यांनी ठाकरेंवर केला. हिंगोली येथील जाहीर सभेत शासनाच्या विकासकामांची माहिती त्यांनी यावेळी दिली.

 

ते पुढे म्हणाले, आमचे सरकार हे दिलेला शब्द पाळणारे असून आम्ही थेट जनतेत जाऊन काम करत आहोत. घरात बसून फेसबुक लाईव्हद्वारे आम्ही काम करत नाही असं म्हणत मुख्यमंत्र्यांनी ठाकरेंना टोला लगावला. दरम्यान, विधानसभाध्यक्ष नार्वेकर शिवसेना आमदार अपात्रता निकालावर काय निकाल देणार, याकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष याकडे निकालाकडे लागले आहे.

Share This Article
error: Content is protected !!