राहुल नार्वेकरांच्या फोटो प्रतिमेस माहूर युवासेनेतर्फे जोडे मारुन निषेध!

abhishek bakkewad
1 Min Read
Spread the love

 

माहूर तालुका प्रतिनिधी/विजयसिंह हजारी

माहूर – आजकाल एकाच घरातील एकाच रक्ताच्या नात्यात विचार भिन्नता किंवा स्वार्थ आडवा आल्यावर सख्खे भाऊ हे पक्के वैरी होऊन विभक्त झाल्याच्या अनेक घटना पाहावयास मिळतात. तर मग जिथे राजकारणातील वेगवेगळ्या पार्ट्या त्याला कशा अपवाद ठरतील बरं.शिवसेना फुटून दोन गटात विभाजन झाले आणि राज्यातील सत्तासंघर्ष पराकोटीला पोहचला.त्यातूनच अख्या महाराष्ट्रासह संपूर्ण देशवासीयांचे बहुप्रतिक्षीने लक्ष लागून असलेल्या शिवसेना शिंदे गटाचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या सह १६ आमदारांच्या पात्र अपात्रतेबाबतच्या निकालाचा बुधवार दि.१० जानेवारी रोजी विधानसभा सभागृहात अखेर निकाल लागला.राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या सह १६ आमदारांना विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी पात्र ठरवले आणि शिवसेना उबाठा गट प्रचंड अस्वस्थ झाले.याचे पडसाद सर्वत्र उमटल्याचे कालपासूनच पाहावयास मिळत असून,शिवसेना शिंदे गटाच्या बाजूने एकतर्फी निकाल दिल्याच्या निषेधार्थ आज गुरुवार ११ रोजी शिवसेना (उबाठा)
युवासेना नांदेड जिल्हाप्रमुख ॲड.यश खराटे यांच्या नेतृत्वाखाली युवासेनेतर्फे माहूरच्या डॉ.बाबासाहेब आंबेडकर चौकात राहुल नार्वेकर यांच्या फोटो प्रतिमेला (पोस्टरला) जोडे मारून तिव्र स्वरूपात निषेध व्यक्त करण्यात आला.यावेळी नार्वेकर यांच्याच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यात आली.

यावेळी युवासेना उपजिल्हाप्रमुख जितू चोले,तालुकाप्रमुख अक्षय वाघ,शहर प्रमुख संदीप गोरडे, महिला आघाडीच्या सुरेखा तळणकर,पवन चव्हाण,सचिन राठोड,प्रेम जयस्वाल,अक्षय आराध्ये,प्रवीण बरडे,गोकुळ गिनगुले,ऋषिकेश खंदारे,सोनू तेल्हारे,मनोज जाधव,विलास पाटील,समाधान दवणे,सुनील चुंगडे,अभिषेक जोगदंड यांच्या सह युवा सेनेचे पदाधिकारी, कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

TAGGED:
Share This Article
error: Content is protected !!