आनिल वाघमारे यांची भाजपाच्या भटक्या विमुक्त आघाडी प्रदेश चिटणीसपदी नियुक्ती

abhishek bakkewad
2 Min Read
Spread the love

 

माहूर तालुका प्रतिनिधी विजयसिंह हजारी

माहूर – गेल्या अनेक वर्षांपासून अगदी माजी मंत्री डी.बी.पाटील यांच्या किनवट/माहूर आमदारकीच्या सुवर्ण काळापासून माहूर तालुका भाजपाची धुरा आपल्या खांद्यावर समर्थपणे एकनिष्ठपणे वाहून नेणारे,मध्यंतरीच्या खडतर काळात भले भले संगीसोबती पदाधिकारी संधीसाधूनी भाजपातून काढतापाय घेतल्यानंतरही आपला पक्षावरील दृढ विश्वास यत्किंचितही ढळू न देता अत्यंत इमानेइतबारे पक्षाचे काम करत असलेले माहूर भाजपाचे ज्येष्ठ नेते अनिल दत्तात्रेय वाघमारे यांची त्यांनी पक्ष संघटना वाढीसाठी केलेल्या कार्याची दखल घेऊन भारतीय जनता पक्षाच्या भटक्या विमुक्त आघाडीच्या प्रदेश चिटणीस पदी नियुक्ती करण्यात आली आहे.राहुल गोविंदराव केंद्रे अध्यक्ष भाजपा व्हिजेएनटी आघाडी,महाराष्ट्र प्रदेश,निवडणूक प्रमुख लातूर लोकसभा तथा मा.अध्यक्ष जिल्हा परिषद,लातूर यांनी १० जानेवारी रोजी त्यांना

यासंदर्भातील नियुक्ती पत्र दिले आहे.

 

अनिल वाघमारे यांना राहुल केंद्रे अध्यक्ष भाजपा व्हिजेएनटी आघाडी महाराष्ट्र प्रदेश यांनी त्यांच्या स्वाक्षरीने दिलेल्या नियुक्ती पत्रातून विश्वास व्यक्त करण्यात आला आहे कि, प्रथम राष्ट्र,नंतर पक्ष,व शेवटी स्वतः या विचारावर भारतीय जनता पक्षाची देशभरात यशस्वी वाटचाल चालू आहे.देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वात भारत देशाची वाटचाल जागतिक महासत्ता होण्याकडे चालु आहे.जगात सर्वात जास्त सदस्य संख्या असलेल्या भारतीय जनता पक्षाचा विचार देशासाठी अत्यंत आवश्यक आहे.व हे कार्य पुढे नेण्यासाठी वाघमारे यांना भारतीय जनता पक्षाच्या भटक्या विमुक्त आघाडीचे पदाधिकारी म्हणुन नियुक्त करण्यात येत असल्याचे लिहिले आहे.

तसेच,पक्षाचे विचार तळागाळातील सर्वसामान्य व्यक्तीपर्यंत पोहचवून व अधिकचा वेळ देऊन आपण आपल्या पदाला न्याय द्याल या अपेक्षेसह त्यांना पुढील कार्यासाठी नियुक्ती पत्रातून शुभेच्छा देण्यात आलेल्या आहेत.

त्यांच्या या नियुक्तीचे सर्व स्तरातून अभिनंदन करण्यात येत असून,शुभेच्छांचा वर्षाव करण्यात येत आहे.

TAGGED:
Share This Article
error: Content is protected !!