मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत माजी उपसभापती सुरेश बिल्लेवाड यांचा शिवसेनेत जाहीर प्रवेश.

abhishek bakkewad
1 Min Read
Spread the love

भोकर प्रतिनिधी /गोविंद चिखलवाड 

भोकर – येथील पंचायत समितीचे माजी उपसभापती सुरेश बिल्लेवाड यांची काँग्रेसला सोडचिट्टी करून त्यांनी बाळापूर येथील एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत झालेल्या शिवसंकल्प मेळाव्यात त्यांनी शिवसेनेत जाहीर प्रवेश केला. यामुळे तालुक्यातील राजकीय समिकरण बदलणार असे दिसून येते. भोकर विधानसभा मतदारसंघ हा माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांचा असून या तालुक्यात काँग्रेसचे पक्षाचे वर्चस्व आहे. 2017 मध्ये झालेल्या पंचायत समितीच्या निवडणुकित त्यांनी अपक्ष म्हणून निवडून आले होते . त्यावेळी काँग्रेस पक्षाला सत्ता स्थापन करण्यासाठी एका सदस्याची गरज होती अशा बिकट समय काँग्रेसला पाठिंबा दिल्याने त्यांची उपसभापती म्हणून वर्णी लागली. त्यानंतर त्यांनी काँग्रेस पक्षामध्ये प्रवेश केला. दरम्यानच्या काळात अशोक चव्हाण यांच्या अवतीभोवती असलेल्या नेत्याकडून त्यांची वागणूक मिळाल्यामुळे त्यांनी नाराज झाले याच कारणामुळे त्यांनी काँग्रेस पक्षात सोडचिट्टी दिली आणि बाळापूर येथील शिवसेनेच्या शिवसंकल्प मेळाव्यात त्यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत त्यांनी भगवी दस्ती घालून शिवसेना शिंदे गटात जाहीर प्रवेश केला . यावेळी खासदार हेमंत भाऊ पाटील, आमदार बालाजी कल्याणकर, आमदार संतोष बांगर, जिल्हा संपर्कप्रमुख आनंद जाधव, जिल्हाप्रमुख आनंदराव बोंडारकर, जिल्हा संपर्कप्रमुख सिद्धार्थ दुधवडकर, जिल्हाप्रमुख उमेश मुंडे, संतोष कपाटे, विकास देशमुख आदींची उपस्थिती होती. यावेळी सुरेश बिल्लेवाड यांनी शिवसेना शिंदे गटाचे काम तालुक्यात जोमाने करून, कार्यकर्त्यांना सोबत घेऊन पक्ष संघटन मजबूत करण्याचं काम आपण करू अशी प्रतिक्रिया त्यांनी दिली.

TAGGED:
Share This Article
error: Content is protected !!