नांदेडच्या सीएसडी कँटीन साठी संरक्षण मंत्री व सेनादल प्रमुखांना निवेदन सादर.

abhishek bakkewad
1 Min Read
Spread the love

नांदेड जिल्हा प्रतिनिधी

नांदेड भारतीय माजी सैनिक संघटना नांदेड तर्फे नांदेड परभणी ,हिंगोली व वाशिम या चार जिल्ह्यांतील हजारो आजी-माजी सैनिक व कुटुंबीयांसाठी नांदेड येथे नियोजित कॅन्टीन सेवा चालू करण्यासाठी श्री राजनाथ सिंग संरक्षण मंत्री व जनरल मनोज पांडे, स्थलसेना अध्यक्ष यांना जिल्हाधिकारी नांदेड मार्फत निवेदन सादर. निवासी उपजिल्हाधिकारी महेश वडदकर साहेब यांनी निवेदन स्वीकारले.

संघटनेची मागणी आहे की जशी लातूरची कॅन्टीन अहमदनगरच्या स्टेशन कमांडर च्या अधिपत्याखाली 2006 पासून चालू आहे त्याचप्रमाणे नांदेडची कॅन्टीन स्टेशन कमांडर औरंगाबादच्या अधिपत्याखाली येथील सुसज्ज इमारतीत त्वरित चालू करण्यात यावी.

यामुळे या चार जिल्ह्यातील लाभार्थ्यांना कॅन्टीन सेवेसाठी छत्रपती संभाजीनगर, बिदर किंवा हैदराबादला जाण्याचा त्रास व खर्च वाचेल.   संघटनेचे जिल्हाध्यक्ष रामराव थडके, सचिव देवराव झगडे व माजी सैनिक केशव मुंडे ,उत्तम कदम व बालाजी भोरगे इत्यादी उपस्थित होते.

Share This Article
error: Content is protected !!