धर्माबाद शहरात प्रा.रविन्द्र पाटील चव्हाण यांच्या उपस्थितीत काँगेसची बुथ निहाय आढावा बैठक संपन्न.

abhishek bakkewad
1 Min Read
Spread the love

नांदेड जिल्हा प्रतिनिधी:संजीवकुमार गायकवाड

नांदेड : काँग्रेस पक्षाचे नेते तथा माजी मुख्यमंत्री अशोकराव चव्हाण यांच्या आदेशानुसार नांदेड लोकसभा मतदारसंघातील बूथ निहाय अध्यक्ष व बूथ कमिटी तयार करण्यासाठी आज युवानेते प्रा.रविंद्र पाटील चव्हाण यांच्या उपस्थितीत धर्माबाद तालुक्यातील सर्व प्रमुख पदाधिकारी गावांमध्ये जाऊन बूथ कमिटी स्थापन करण्यासाठी कार्यकर्त्यांचे मनोगत व चर्चा करून बूथ अध्यक्ष व सदस्य यांचे नाव अंतिम करण्यात आले. तदनंतर कृषी उत्पन्न बाजार समिती मध्ये बूथ नीहाय आढावा बैठक संपन्न झाली.

नायगाव मतदारसंघाचे युवा नेते भावी आमदार रवींद्र पाटील चव्हाण यांच्या नेतृत्वाखाली बैठक लावण्यात आली होती.

यावेळी काँग्रेस तालुकाध्यक्ष दत्ताहरी पाटील चोळाखेकर,वर्णी नागभूषण,गोविंदराव पाटील रोशनगावकर,श्याम पाटील चोळखेकर,माधव पाटील चोंडीकर,शिवाजी पाटील बाभळीकर,दत्ता पाटील चिकनेकर,सूर्यकांत पाटील जुनीकर,गंगाधर तोटलोड,नरेंद्र रेडी,राजू सुरकुटवार,फुलाजी पाटील शिंदे,व्यंकट पाटिल मोरे, संजीवकुमार गायकवाड,सह प्रमुख पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

काँग्रेस पक्षाची संघटनात्मक बांधणी मजबूत करून पक्षाचे विचार प्रत्येक गावात, घरात पोहचवण्यासाठी हे अभियान सुरू आहे.

नागरिकांचा देखील सकारात्मक प्रतिसाद मिळत असून पुन्हा एकदा नायगाव विधानसभा मतदार संघात काँग्रेस पक्ष राजकीय दृष्ट्या मजबूत होईल सर्वसामान्य नागरीक आजही पक्षाच्या विचारांशी ठाम आहेत ही बाब समाधानकारक आहे येणाऱ्या काळात संपर्क अभियान अधिक गतिमान करून संघटन बळकट करण्यावर भर दिला जाईल अशी प्रतिक्रिया युवानेते प्रा.रविंद्र पाटील चव्हाण यांनी व्यक्त केली

Share This Article
error: Content is protected !!