हुस्सा ते राहेर रस्त्यांचे निकृष्ट दर्जाचे काम असल्याचे पत्र थेट मुख्यमंत्री कार्यालयात…

abhishek bakkewad
2 Min Read
Spread the love

 

नायगाव ता प्रतीनिधी/अशोक वाघमारे
नायगाव : तालुक्यातील कुंटूर सरकल अंतर्गत येणाऱ्या हुस्सा ते राहेर रस्त्यांचे काम मोरे पाटील कंट्रक्शन टाकळी च्या माध्यमातून होत असलेले हे काम अति निकृष्ट दर्जाचे होत असल्याचे पत्र थेट मुख्यमंत्री कार्यालयाकडे सादर केल्याचे दिसून येत आहेत.
हुस्सा ते राहेर रस्त्यांचा निधी हे मुख्यमंत्री ग्राम सडक योजनेचा असून यासाठी कोट्यावधीचा निधी आला आहे. काम मात्र निकृष्ट दर्जाचे असल्याने सामाजिक कार्यकर्ते तथा दलित महासंघाचे तालुका अध्यक्ष व माजी ग्रामपंचायत सदस्य हुस्सा श्री डी के वाघमारे यांनी कामाची शहानिशा करून त्यांच्या निदर्शनास आलेले काम हे निकृष्ट दर्जाचे असल्या कारणाने त्यांनी थेट मुख्यमंत्री कार्यालयाला पत्र व्यवहार करून कामांची योग्य ते चौकशी करण्यात यावी अशी मागणी करण्यात आली आहे.
सदर काम हे मनोज मोरे पाटील टाकळीकर यांनी करत असून या कामांमध्ये मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार असल्याचे सांगण्यात येत आहे. हे काम करण्यासाठी सरकारने कोट्यावधीचा निधी पुरवला असून देखील कामात मात्र सारवा सारव होत असल्याची एकंदरीत चित्र व वास्तव दिसून येत आहे. सदर रस्त्यासाठी वापरलेला मुरूम हा अति निकृष्ट दर्जाचे दिसून येत असल्याने त्यात 50 टक्के मातीचा आणि 50 टक्के मुरमाचा वापर केलेला आहे. सदर कामाची चौकशी आता मुख्यमंत्री कार्यालय कडून होते का असे प्रश्न आता जनतेकडून होताना दिसून येत आहेत. शासन आपल्या दारीच्या संकल्पनेतून मुख्यमंत्री आता जनतेचे प्रश्न मीठवणार का असे उलट सुलट चर्चा आता सामान्य जनतेकडून होताना दिसून येत आहे. सरकार हे सर्वसामान्य व गोरगरीब जनतेचे सांगण्यात येत असल्याने जनतेला आता मुख्यमंत्री कार्यालयाकडून योग्य तो न्याय मिळेल का? अशा आशयाचे पत्र आता थेट मुख्यमंत्री कार्यालयाकडे पाठवण्यात आले आहे. त्याचबरोबर जिल्ह्यातील सार्वजनिक बांधकाम विभागातील तालुका अभियंता व जिल्हा अभियंता अन्य सार्वजनिक बांधकाम विभागातील अधिकाऱ्यांनी याकडे लक्ष देऊन त्या रोडची सखोल चौकशी करून कामामध्ये सत्यता आणून देतील का अशी मागणी आता थेट जनतेकडून होताना दिसून येत आहे. अन पावसाळ्यामध्ये त्या रस्त्याची दूर दशा होत असल्याने हुस्सा व राहेर येथील नागरिकांना रस्त्यावरून जात असताना मोठा त्रास सहन करावा लागत आहे.

Share This Article
error: Content is protected !!