पुणे जिल्हा प्रतिनिधी/
पुणे: पावसाळ्यात उद्भवणारे आजार व पूर परिस्थिती यावर प्रभावीपणे त्वरित कार्य करण्यासाठी आरोग्य विभागाने जिल्हा पातळी व गाव पातळीपर्यंत केलेल्या आरोग्य सेवा तयारीचा डॉ.तानाजी सावंत, आरोग्य मंत्री यांनी आढावा घेतला. यावेळी आरोग्य विभागाचे अतिरिक्त मुख्य सचिव मिलिंद म्हैसकर, आरोग्य सेवा आयुक्त धीरज कुमार, संचालक डॉ. नितीन अंबाडेकर, सह संचालक आरोग्य सेवा ( हिवताप, हत्तीरोग व जल जन्य रोग ) डॉ बबीता कमलापूरकर मॅडम, राज्य किटकशास्त्र श्री अनुषे यांची यावेळी उपस्थिती होती.
या बैठकित जोखीमग्रस्त गावे ओळखून त्याच्याप्रमाणे टीम तयार करून शीघ्र प्रतिसाद पथके सज्ज ठेवावीत, कर्मचाऱ्यांना प्रशिक्षण देण्यात यावे व उद्रेक झाल्यास त्वरित उपाययोजना करण्यात यावी, तयारीसाठी जिल्हा स्तरावरील अहवाल रोजच्या रोज तयार करण्यात यावा व त्यावर बारकाईने लक्ष ठेवण्यात यावे, पिण्याच्या पाण्याचे स्तोत्र तपासून पाहावेत ज्यामुळे पाणी पिण्यास योग्य आहे किंवा नाही याची खात्री केली जावी, जिल्ह्यातील नोडल ऑफिसर त्यांचे दूरध्वनी क्रमांक याची यादी तयार करून ती प्रत्येक जिल्ह्याच्या ठिकाणी अद्यावत ठेवावी व राज्य स्तरावरही पाठवावी, साथरोग नियंत्रणासाठीच्या किट वाटप करण्यात याव्यात व त्याचा अद्यावत अहवाल तयार ठेवावा, आशाताई व आरोग्य कर्मचारी यांच्या याद्यासुद्धा जिल्हा आरोग्य अधिकारी जिल्हा परिषद यांच्याकडे ठेवण्यात याव्यात तसेच डास उत्पत्ती ठिकाणे यावरही लक्ष द्यावे व पाणी साठे चांगले राहतील यावरही लोकसहभागाद्वारे नियंत्रण ठेवावे, शीघ्रकृती पथकाद्वारे तयार करावयाचे कामे तसेच सूचनासाठी एक बुकलेट तयार करण्यात यावे व मार्गदर्शक सूचना देण्यात याव्यात, औषध साठा आद्यवत करून उपलब्ध ठेवण्यात यावा, साथ रोगाबाबतची माहिती लावण्यासाठी ग्रामपंचायत, नगरपंचायत येथे बोर्ड ही लावण्यात यावेत, अशा सूचना यावेळी आरोग्य मंत्री डॉ. तानाजी सावंत यांनी केल्या. अतिरिक्त मुख्य सचिव यांनी साथ रोगाबाबतची माहिती लोकांपर्यंत जाण्यासाठी व्यापक जनजागृती करावी, असे सूचित केले. कठीण परिस्थितीत आरोग्य विभाग चांगली जबाबदारी पार पाडत असून पावसाळ्यातील आरोग्य परिस्थितीही व्यवस्थितपणे हाताळण्यास सर्वांनी सक्रिय रहावे, असेही यावेळी सुचविण्यात आले. यावेळी आरोग्य विभागातील विभागीय आरोग्य उपसंचालक, जिल्हा शल्य चिकित्सक, जिल्हा आरोग्य अधिकारी सर्व ऑनलाईन पद्धतीने उपस्थित होते.
आरोग्य विभागामार्फत पावसाळ्यातील डेंगू,मलेरिया, जापानी मेंदूजवर, लेप्टोस्पायरोसिस या आजारांना प्रतिबंधासाठी खालील प्रमाणे उपयोजना करण्यात आल्या आहेत.
-जोखीमग्रस्त गावांची यादी तयार करण्यात आली आहे.
– गृहभेटी व आरोग्य कर्मचाऱ्या मार्फत सर्वेक्षण व रुग्णशोध मोहीम.
– आश्रम शाळा यांना वैद्यकीय अधिकारी, कर्मचारी यांच्या मार्फत नियमित भेटी.
– पाणी गुणवत्ता नियंत्रण 76 हजार पाणी नमुने तपासण्यात आले आहेत.
– पाण्याच्या स्रोतांचा सर्व्हे
– एकात्मिक कीटक व व्यवस्थापन यात परिसर स्वच्छता, डासांचे पासून वैयक्तिक संरक्षणसाठी मच्छरदाणी, डास प्रतिबंधक क्रीम, खिडक्यांना जाळ्या बसविण्याबाबत समुपदेशन करण्यात आले .
-प्रयोगशाळा सिद्धता
– पुरेसा औषध साठा
-शीघ्र प्रतिसाद पथके यांची स्थापना .
-गाव पातळीवर साथ रोग सर्वेक्षण तसेच अंतर विभागीय समन्वय व आरोग्य शिक्षण यावरही भर देण्यात येत आहे.