कोणाच्या आशीर्वादाने चालतो भेसळयुक्त खुल्या पेट्रोल डिझेलचा गोरखधंदा

abhishek bakkewad
2 Min Read
Spread the love

एक तर मापात पाप वरून भेसळयुक्तीचा ताप

पर्दाफाश होणार की आशीर्वाद राहणार?

नांदेड जिल्हा प्रतिनिधी:संजीवकुमार गायकवाड

नांदेड – जिल्यातील धर्माबाद शहर आता नवं नवीन कारणासाठी चर्चेत येत आहे. धर्माबाद शहर व तालुक्यात गावो गावी गल्ली बोळ्यात भेसळयुक्त पेट्रोल आणि डिझेल विक्री चा गोरखधंदा मोठ्या प्रमाणात चालू आहे.

एक लिटरचे पैसे घेऊन 500 ते 600 एम.एल पेट्रोल आणि डिझेल भेसळयुक्त पाणी बॉटल मध्ये देण्यात येते पेट्रोल आणि डिझेल भेसळयुक्त तयार करण्यासाठी जी.पी.थिनर,एम.टी.ओ मिक्स ॲरोमॅटिक आणि हॅक्झेन असे ज्वलनशील पदार्थ वापरल्या जात आहेत.

या ज्वलनशील पदार्थांचा वापर करून ठीक ठिकाणी भेसळयुक्त पेट्रोल आणि डिझेल तयार करण्यात येत आहे.

भेसळयुक्त डिझेल माफियांवर कलम 420,120ब 34 सह 1955 चे कलम 3,7,10 तसेच विविध पेट्रोलियम कलमान्वये गुन्हे दाखल होवू शकतात मात्र अद्याप पर्यंत कोणतीच कार्यवाही झाली नाही या मागचे गौडबंगाल काय आहे.

भेसळयुक्त पेट्रोल आणि डिझेल तयार करण्यात मोठे रॅकेट असण्याची दाट शक्यता आहे.पेट्रोल व डिझेलमध्ये होत असलेली भरमसाट भेसळ आणि रॉकेलची चोरी याबद्दल सर्वोच्च न्यायालयाने शुक्रवारी चिंता व्यक्त केली.भेसळ रोखण्यासाठी काय उपाययोजना करण्यात येत आहेत,याची माहिती पेट्रोलियम मंत्रालयाने शपथपत्राद्वारे द्यावी, असे न्यायालयाने सॉलिसिटर जनरलना सांगितले.ग्रामीण आणि नागरी भागात पेट्रोल आणि डिझेलमध्ये प्रचंड प्रमाणात भेसळ असते,असे सांगून न्यायालयाने हे सगळे रोखण्यासाठी काय उपाययोजना करणार हे सहा आठवड्यांत स्पष्ट करा असे आदेश दिले आहेत.

एक तर मापात पाप त्यावरून भेसळयुक्त पेट्रोल आणि डिझेल जागो जागी विना परवान्याच्या दुकानातून देण्यात येत आहे त्यामुळे जागृत नागरिकांनी पेट्रोल पंपावरूनच इंधन घ्यावे असे मोटारसायकल मेकॅनिल यांनी आवाहन केले आहे.

Share This Article
error: Content is protected !!