कित्येक अपघात झाल्यानंतर प्रशासनाला आले उशिरा शहाण पण
नांदेड जिल्हा प्रतिनिधी:संजीवकुमार गायकवाड
नांदेड – जिल्यातील धर्माबाद तालुक्या मधील बाभळी फाटा टी पॉइंट वर सलग दोन दिवसात कोणत्याच प्रकारचे दिशा दर्शक बसवले नसल्यामुळे दोन अपघात झाले असून एका अपघातात ट्रक मधील सात म्हशी ठार झाल्या तर सहा गंभीर जखमी झाल्या व ड्रायव्हर गंभीर जखमी झाला त्यात अंदाजे वीस लाख रुपयांचे नुकसान झाले तर दुसऱ्या अपघातात फळांचा टेंपोचा अपघात होऊन लाखोंच्या फळांचे नुकसान झाले सदरील अपघात हे तेथील रस्त्यावरील हॉटेल मुळे व वळण रस्त्यामुळे होत असल्याचे प्रथमदर्शी दिसत असल्यामुळे उपजिल्हाधिकारी स्वाती दाभाडे मॅडम,पोलीस निरीक्षक अभिषेक शिंदे ,उपअभियंता सुहास सर,के टी कंट्रकशन चे अतुल शिंदे यांनी त्वरित याची दखल घेऊन बाभळी फाटा टी पॉइंट येथे बॅरिकेट्स बसवण्यासाठी संबंधित विभागास सूचना केल्या संबंधित विभागाच्या इंजिनियरने याचे त्वरित पालन करून काल रात्री पर्यत बॅरिकेट्स,सूचना फलक व रबर स्पीडब्रेक बसवून अपघात होणार नाहीत याची दक्षता घेतली व त्याठिकाणी असलेल्या हॉटेल मालकास रस्त्यावरचे अतिक्रमण हटवण्याची नोटीसही बजावली आगामी काळात जिल्हाधिकारी साहेबांच्या परवानगीने बिलोली रोडवर व धर्माबाद रोडवर स्पीड ब्रेकर बसवनार असल्याची माहिती बांधकाम विभाग देगलूरचे उपअभियंता यांनी दिली
महसूल,पोलीस,बांधकाम व कन्ट्रक्शन कंपनीनेदोन अवजड वाहन पलटी घाऊन कित्येक अपघात झाल्यावर व त्यांचे नुकसान झाल्यावर त्वरित दखल घेतल्यामुळे त्यांचे जनसामान्य नागरिक कौतुक करत आहेत.