इंदिरा गांधी प्राथमिक शाळा सिडको नांदेड जिल्हा स्काऊट गाईड मेळाव्यात भरघोस यश

abhishek bakkewad
2 Min Read
Spread the love

नांदेड जिल्हा प्रतिनिधी:संजीवकुमार गायकवाड

नांदेड – भारत स्काऊट गाईड जिल्हा कार्यालय नांदेड तर्फे आयोजित जिल्हा मेळावा माध्यमिक व उच्च माध्यमिक आश्रम शाळा कुंटूर तांडा ता.नायगाव जि. नांदेड येथे श्री. शारदा भवन एज्युकेशन सोसायटी संचलित इंदिरा गांधी प्राथमिक शाळा सिडको नांदेड यांनी इंदिरा गांधी युनिट बुलबुल,छत्रपती शाहू महाराज कब युनिट यांनी सहभाग घेऊन शेकोटी कार्यक्रमात एकूण नांदेड जिल्ह्यातून ५५ शाळेने सहभाग नोंदवला होता. इंदिरा गांधी प्राथमिक शाळेच्या बुलबुल ने अंबाबाईचा गोंधळ या गीतावर सादरीकरण केले.आणि या स्पर्धेमध्ये जिल्ह्यातून प्रथम क्रमांक मिळवला
व कब पथकाने हे राजे या गाण्यावर सादरीकरण करून जिल्ह्यातून तृतीय क्रमांक मिळवला आहे.

वैयक्तिक विविध स्पर्धा घेण्यात आल्या डोळे झाकून बादलीत चेंडू टाकण्याच्या स्पर्धेत वेदांत जगन्नाथ शिंदे यांनी द्वितीय, क्रमांक पटकावला आहे.
स्पर्धेतील विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करण्यासाठी युनिट लीडर बी. व्ही.मस्के सर्वतोपरी परिश्रम करणारे बालाजी मोटरगे, व शाळेच्या मुख्याध्यापिका श्रीमती शिंदे ए.डि. यांनी वेळोवेळी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले.
यशस्वी सर्व बुलबुलचे सौ शिंदे, मुख्याध्यापिका या कार्यक्रमाचे बक्षीस वितरणासाठी स्काऊट गाईडचे जिल्हा संघटक आयुक्त जनार्दन इरले सर, यांनी मोलाचे मार्गदर्शन केलं
तसेच जिल्हा आयुक्त सौ.भागिरथी बच्चेवार यांनी मुलांना स्वावलंबन आत्मविश्वास कर्तव्य चारित्र्यवान बनलं पाहिजे याविषयी सविस्तर मार्गदर्शन केले.

या वेळी
जिल्हा सहाय्यक आयुक्त के. एल.जाधव सर यांनी मार्गदर्शन केले,इंदिरा गांधी हायस्कूलचे मुख्याध्यापक बालाजी शिंदे सर, पर्यवेक्षिका सौ.एल.वाय. कोलेवाड मॅडम,
सौ.एन.एस.चव्हाण मॅडम, सौ कुलकर्णी मॅडम,या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन मस्के सर यांनी केले तर आभार सौ.सारिका पडोळे मॅडम यांनी मानले या कार्यक्रमासाठी अनेक पालकांनी आपली उपस्थिती लावली होती.

Share This Article
error: Content is protected !!