सोयाबीन पिवळी पडत असल्याचे कारणे व‌ ऊपाय खालील प्रमाणे करावे – कृषी अधिकारी जाधव

abhishek bakkewad
4 Min Read
Spread the love

हिमायतनगर ता.प्रतिनिधी/ जरगेवाड बाबाराव 
हिमायतनगर / ब-याचशा शेतकरी बंधुच्या शेतातील सोयाबीन पिकाचे पान पांढरे व नंतर पिवळे पडत शेवटी करपणे असा प्रकार होत आहे. याची निरिक्षण केलेली बरेचशे कारणे ती पुढिल प्रमाणे आहेत.

1) ज्या जमिनी गावालग गढीची माती किंवा पांढरी माती अशा जमिनीत. लोह म्हणजे फेरसच्या कमतरते मुळे सोयाबीन व ईतर पिके सुरुवातीपासुन पांढरट पिवळी पडतात.
2) चोपन जमिनीत किंवा चुनखडीचे प्रमाण आसलेल्या जमिनीत काही ठिकाणी इतर जमिनित सुद्धा जास्त जोराचा पाऊस किंवा पाणी साचुन मुळांना हवा न लागल्यामुळे अन्न द्रव्याची कमतरता विशेषतः लोह(फेरस),जस्त (झिंक ) , नत्र व पालाश ची कमतरता जानवते.
3) या वर्षी ब-याचशा शेतकरी बंधुनी हळद वअद्रक ट्रॕक्टर चलित पेरणी यंत्रने लागवड केली. या पेरणी मुळे हळद व अद्रक खुप खोल पडते जवळ पास 1 फुटा पर्यंत असल्याचे मी बघीतले. यावर जोराचा पाऊस पडल्यानतर जमिन पॕक होते व खुप खोल पडल्यामुळे कोंब वर यायाला खुप ताकद आणि वेळ लागतो व तसेच मुळांना हवा न लागल्यामुळे परत वरील अन्न द्रव्याची कमतरता. जानवते.
4) बरेच शेतकरी बंधु मागील हंगामात शिल्लक आसलेले सोयाबीन, हरबरा गव्हाचे कुटार शेतात पसरुन देतात अशा ठिकाणी किंवा काडी कचरा जास्त असलेल्या ठिकाणी किंवा अर्धवट कुजलेले शेणखत वापरलेल्या ठिकाणी झाडे सुरवातीला पिवळी पडतात व नंतर बुडाजव स्केलोरोशिअम म्हणजे पांढऱ्या बुरशीची वाढ होते व उभळ लागते. हे एक कारण आहे.
5)काडी कचरा जास्त असलेल्या ठिकाणी म्हैस किडीचा प्रादुभाव जास्त प्रमाणात दिसतात. आशा ठिकाणी पिकाचा जमिनीखालील भाग ह्या किडीची अळी व म्हैस किडा कुरतडुन खातो व झाडाला इजा होतात झाड मरत नाही पण पिवळे पडते व वाढ खुंटते.
6) ज्या जमिनीत मागिल हंगामात उन्हाळ्यात शेवटपर्यंत ओलित केले गेले आशा ठिकाणी सुद्धा पिका मध्ये वरील अन्न द्रव्याची कमतरता येऊन पिक पांढरट पिवळे झाल्याचे दिसुन येते.
7 ज्या जमिनी लालसर भुरकट हलक्या आहेत आशा जमिनित पालाशाची व नत्राची कमतरता येते. पालाशाची कमतरता ओळखतांना झाडाची पाने पानाच्या कडेकडून सुरुवातीस पिवळसर व नंतर लालस करड्या किंवा तपकीरी होऊन वाळायला लागतात. अशा प्रकारे वेगवेगळी कारणे आहेत.

या साठी कृषी विभाग हिमायतनगर चे कृषी अधिकारी श्री जाधव यांनी सांगितलेले उपाय योजना करावे असे आवाहन त्यांनी केले आहे.
1) जेथे पांढऱ्या जमिनी आहेत किंबहुना सर्वच जमिनीत पेरते वेळेस एकरी 10 किलो झिंक सल्फेट + 5 किलो फेरस सल्फेट + 10 किलो गंधक व खत वापरताना पोट्याश असलेले खत जसे 10-26-26 , 12-32-16, 14-35-14 आशी खत वापरावी व बियाण्याला रायझोबीअम पीएसबी व केएम बी ची या द्रवरुप संवर्धकाची 10 मिली व ट्रायकोडर्मा 4 ग्रॕम प्रती किलो प्रमाणे बीजप्रक्रिया करावी.
2) पिक पिवळे दिसुन आल्यास सुक्ष्म अन्नद्रव्याचे मिश्रण( जसे चिलमिक्स काम्बी किंवा लिब्रेल ) 20 ग्रॕम
किंवा फेरस edta 15 ग्रॕम + झिंक edta 15 ग्रॕम व 19-19-19 70 ग्रॕम किंवा युरीया 2% प्रती पावरस्प्रे घ्यावे.
3) लालसर जमिनित पोट्याशची कमतरता दिसुन येते आशा जमिनित पोट्याशयुक्त खत पेरतेवेळेसच द्यावे व फवारणीत 13-0-45 किंवा 00-00-50 70 ग्रॕम घ्यावे व सोबात वरिल प्रमाणे शुक्ष्मआन्नद्रव्ये घ्यावे.
4) शक्यतो कुटार व शेणखत चांगले कुजल्याशिवाय वापरुच नाही. किंवा आशा ठिकाणी कार्बन नत्र( C:N) गुणोत्तर कायम ठेवण्यासाठी सुरुवातीलाच 20 दिवसाच्या आत थोडा युरीया फेकावा. कारण काडी कचरा, कुटार कुजतांना शेतावरील नत्र वापरल्या जाते व नत्राची कमतरता येते. व तेथे गर्मी तयार होऊन झाडाला बुरशी लागते… अशा प्रकारे अपल्या पिकाचे नियोजन करून पिक उत्पादन वाढवावे.

Share This Article
error: Content is protected !!