पिंपळकौठा येथे शेतकरी पुत्रांचा वीज पडून जागीच मृत्यू

abhishek bakkewad
1 Min Read
Spread the love

मुदखेड प्रतिनिधी/ राहुल कोलते

मुदखेड – तालुक्यातील पिंपळकौठा (चोर) आपल्या शेतामध्ये काम करून घरी येत असताना 22 फेब्रुवारी रोजी सायंकाळी 5 वाजताच्या दरम्यान अवकाळी पावसाच्या हजेरीत कॅनललगत अंगावर विज पडून दत्ता दिगंबर वाघमारे या 22 वर्षे तरुण शेतकरी पुत्रांचा जागेच मृत्यू झाल्याची घटना सायंकाळी 5 च्या दरम्यान घडली.

या घटनेची माहिती भाऊराव चव्हाण कारखान्याचे माजी संचालक भीमराव पाटील कल्याणे, पत्रकार संजय कोलते यांनी महसूल प्रशासनाला माहिती दिली दुपारी 3 च्या दरम्यान शहर व तालुक्याच्या अनेक ठिकाणी गारा आणि विजेच्या कडकट्यासह अवकाळी पावसाने थैमान घातले. यामध्ये शेतीपिकासह शेतकऱ्यांचे खूप मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले. कोल्हा, मेंडका, वाई, वरदडा या गावासह तालुक्यातील अनेक ठिकाणी पावसाचा फटका बसला. या घटनेने तहसीलदार मुगाची काकडे यांनी सूत्र हलवले पोलीस प्रशासनाला माहिती दिली . सपोनि बाबासाहेब कांबळे व त्यांचे सहकारी घटनास्थळी दाखल झाले आणि पंचनामा केला ग्रामीण रुग्णालयाच्या वैद्यकीय अधीक्षक डॉ. वृषाली येमेकर यांना देखील शेवविच्छेदनाच्या अनुषंगाने कळविले असल्याचेही तहसीलदार मुंगाजी काकडे यांनी सांगितले. या शेतकरी मयत पुत्राच्या कुटुंबाला शासनाने मदत करावी. अशी मागणी करीत आहेत.

Share This Article
error: Content is protected !!