जि.प. उच्च प्राथमिक शाळा चिलपिंपरी चे NMMS परीक्षेत घवघवीत यश….

abhishek bakkewad
2 Min Read
Spread the love

मुदखेड प्रतिनिधी /राहुल कोलते

मुदखेड- तालुक्यातील मौजे चिलपिंपरी शाळेची यशोगाथा. याच वर्षी नव्यानेच आठवा वर्ग सुरू केल्यानंतर बसायला जागा नाही, वर्गखोल्या नाहीत.आठ वर्गाला व 196 विद्यार्थ्यांना शिकवायला केवळ चारच शिक्षक . त्यातही ऑनलाईन कामे, शिक्षकांच्या रजा,प्रशिक्षण,विद्यार्थ्यांच्या सुट्ट्या , कोरोनामुळे वाया गेलेले दोन वर्ष अशा अत्यंत अडचणीच्या काळातून पुढे जाणे व अत्यंत अवघड असलेली NMMS परीक्षेत यश मिळवणे,हे अत्यंत अवघड व जिकरीचे काम होते.
एका एका शिक्षकाला दोन दोन वर्गाला शिकवावे लागायचे. आठविलाच शिकवू लागले तर बाकीच्या वर्गावर अन्याय व्हायचा.त्यांना शिकवावेच लागायचे,त्यामुळे आठवीच्या वर्गाला शिकवायला वेळ मिळायचा नाही. परंतु कुणाकडेही, कसलीही तक्रार करायची नाही,कुणाकडूनही कसलीही अपेक्षा करायची नाही,असा करारी बाणा असणारे मुख्याध्यापक चंद्रकांत घोडगे व त्यांचे सहकारी शेख नूर, यशवंत महाजन व विष्नुकांत शिंदे यांनी रात्री आठ ते दहा या वेळेत ऑनलाईन वर्ग घेतले. दिवाळीच्या केवळ तीन सुट्ट्या घेतल्या.येणाऱ्या सर्व अडचणी सोडविल्या. बावीस प्रश्पत्रिका सोडवून घेतल्या. त्यामध्ये अत्यंत अवघड प्रश्न सोप्या पद्धतीने व कमी वेळात कसे सोडवावे, याची माहिती दिली.
अशा पद्धतीने सर्व शिक्षकांच्या अत्यंत कठोर व अथक परिश्रमाने NMMS परीक्षेत
तब्बल आठ विद्यार्थी उत्तम गुणांनी उत्तीर्ण झाले .
यात आकाश गाढे,संगम आवरे, अजय गाढे, सुमित गाढे, अंकिता कोलते, रोहिणी गाढे,युवराज जाधव, स्वाती कोलते यांचा समावेश आहे.
मिळालेल्या यशाबद्दल सर्व विद्यार्थी आणि शिक्षकांचे सर्व स्तरावरून कौतुक आणि अभिनंदन करण्यात येत आहे .

Share This Article
error: Content is protected !!