माहूर तालुका प्रतिनिधी/विजयसिंह हजारी
माहूर : मनुष्य हा परिवर्तनवादी आहे. आणि परिवर्तनासाठी स्वतः सह सामाजिक व नागरी विकास महत्त्वाचा आहे.मात्र कुठलाही बदल हा एका दिवसात,एका वर्षात साध्य होत नाही,तर बदलासाठी कार्यातील सातत्य असणे गरजेचे आहे.आणि त्यासाठी हवे असते योग्य नेतृत्व.
यासाठी एखाद्या च्या अंगी योग्य नेतृत्व गुण असणे महत्त्वाचे असते.साधारणतः धाडसीपणा आणि पेचप्रसंगात स्वतःहून पुढाकार घेण्याची तयारी यांना नेतृत्वगुण मानले जाते.चांगल्या नेत्याला हे गुण आवश्यकच असतात पण नेतृत्वगुणात सर्वाधिक महत्व असते ते चारित्र्याला.उत्तम चारित्र्यवान माणसाविषयी जनमानसात एक विश्वासार्हता निर्माण झालेली असते.आणि ही विश्वासार्हता निर्माण केली आहे ती माहूर नगरपंचायतचे नगराध्यक्ष फिरोज दोसानी यांनी.जवळपास ५० हजारांहून अधिक लोकसंख्या असलेले माहूर शहर आता मागासलेपणाची कात टाकू लागले आहे.अलीकडच्या काळात जी विकासकामे मार्गी लागत आहेत ती माहूरच्या विकासात्मक सौंदर्यात अधिकच भर घालत असल्याचे वास्तव सर्वांना मान्यच करावे लागेल यात कोणीही शंका घेण्याचे कारण नाही.
२६ जून १९९९ रोजी किनवट मधून विभक्त होऊन माहूर हा एक स्वतंत्र तालुका जरी झाला असला तरी विधानसभा मतदारसंघ मात्र किनवट मध्ये मोडतो.ही नक्कीच माहूरकरांसाठी खेदाची बाब आहे.तदनंतर कालांतराने माहूर ग्रामपंचायतीचे नगरपंचायत मध्ये २०११ मध्ये रुपांतर झाले,
पहिल्या टप्यात म्हणावा – तसा विकास साधता आला नाही. विकासापेक्षा राजकीय साठमारीच माहूरकरांनी या काळात अनुभवली.माहूर शहरात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा मित्र पक्ष असलेल्या काँग्रेसच्या समर्थनातून प्रथम नगराध्यक्ष झाला होता,मात्र एकच वर्षात काँग्रेसच्या मंडळीं कडून पाठीत खंजीर खुपसून अविश्वास आणण्यात आला.ही बाब आजही राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या जिव्हारी लागून एक शर बनून सलत असल्याचे दिसून येते.त्यानंतर अनुभवाची कमतरता,प्रशासकीय मंडळींची कुजकी मानसिकता यामुळे केंद्र, राज्य सरकार व जिल्हा नियोजनमधून भरीव निधी खेचून आणता आलाच नाही.नगर पंचायतचे पहिली पाच वर्ष विकासकामांचा आराखडा, माहिती जाणून घेण्यातच गेलीत. मात्र मागील पाच-सात वर्षांत विद्यमान तथा यापूर्वी अडीच वर्षाचे नगराध्यक्ष राहिलेले फिरोज दोसानी यांच्या भगीरथ प्रयत्नाने आता मात्र शहराचे रुपडे पालटू लागले आहे हे ही तेवढेच खरे.
शहरातून जात असलेले राष्ट्रीय महामार्ग प्रशस्त व १०० फुटाचे व्हावे,त्यात दुभाजक आणि पथदिवे असावे यासाठी अलीकडच्या काळातील नगराध्यक्ष दोसानी यांचा गल्ली पासून दिल्ली पर्यंतच पाठपुरावा, शहरातील सर्व १७ वार्ड मध्ये अंतर्गत रस्ते,पिण्याच्या पाण्याची सोय,घंटागाड्या,घनकचरा प्रकल्प,अग्निशमन दलाची गाडी, हायमास्ट पोल,सोलर लाईट व्यवस्था,समशान भूमी,कब्रस्तान,
परिसराचे सुशोभीकरण, टेकडीवरील गणेश मंदिराच्या पायऱ्यांची सोय,माहूर शहराच्या सौंदर्यात भर घालणाऱ्या भोजंती तलावास पुनर्जीवित करून होत असलेले विशाल असे २५ कोटींच्या निधीतून सुशोभीकरण,बौद्ध भूमी परिसरातील सभागृहासह दोन कोटीची कामे नगराध्यक्ष फिरोज दोसानी व त्यांच्या सत्ताधारी १३ नगरसेवकांच्या टीमने हाती घेतली आहेत.हे ही नसावे थोडके.
*घनकचरा प्रकल्प उभारणी*
—————————————-
माहूर हे तीर्थक्षेत्राचे शहर असल्याने शहरातील कचऱ्याचा प्रश्न गंभीर होता.कचऱ्यामुळे माहूर शहर वाशियांसह भाविकांचे आरोग्य धोक्यात येण्याची शक्यता निर्माण होत होती.यावर उपाय म्हणून,घंटागाड्या,ट्रॅक्टर आले पण शहरातील कचरा टाकायचा कोठे हा प्रश्न होता.राष्ट्रीय महामार्ग असलेल्या पुसद रोडवर उखळी घाटात रस्ताकडेला घनकचरा प्रकल्प उभारून त्या ठिकाणी खत निर्मिती साठीचे प्रयत्न करण्यात आले.आज शहराच्या घनकचरा व्यवस्थापनासाठी आवश्यक असलेला निधी मिळत नसला तरी नगरपंचायत मात्र रोजंदारी कर्मचाऱ्यांच्या माध्यमातून शहरातील स्वच्छतेला प्राधान्य देऊन आहेत.हे निश्चितच स्वागतार्ह आहे.
*चौफेर सर्वसमावेशक कामे*
—————————————-
माहूर शहरातील दोन हिंदू समशान भूमी,दोन मुस्लिम कब्रस्तानचे सुशोभीकरण,
टेकडीवरील गणेश मंदिराच्या पायऱ्यांचा प्रलंबित प्रश्न,
देवदेवश्वरी संस्थांनच्या मालकीचे १० एकर विस्तार असलेले भोजंती तलावाचे सुशोभीकरण, स्वर्गरथ,अग्निशामक बंब,यात्रा काळात आवश्यक असलेले फिरते स्वच्छालय,अहिल्यादेवी होळकर सभागृह,बाजार ओटे, शहरातील प्रत्येक वार्डात गत पाच सात वर्षात कोट्यावधी रुपयांची झालेली रस्ते आणि नाल्यांची कामे,प्रत्येक कुटुंबांना नळाद्वारे पाणी देण्यासाठी झालेला यशस्वी प्रयत्न,प्रत्येक प्रभागात स्ट्रीट लाईट व्यवस्था अशी एक ना अनेक कामे नगराध्यक्ष फिरोज दोसानी यांच्या आतापर्यंतच्या कार्यकाळात झालेली असून,राज्यात सत्ता कोणत्याही पक्षाची का असेना माहूरमध्ये विकास निधी खेचून आणण्यासाठी नगराध्यक्ष दोसानी यांची धडपड निश्चितच वाखाणण्याजोगी आहे.यास विरोधकही नाकारणार नाहीत हे ही तेवढेच खरे.
—————————————-
*विकासकामात स्वतःला झोकून देणारा नगराध्यक्ष*
————————————-
*मागील तीन पंचवार्षिक मी नगर पंचायतचा सदस्य आहे.आजवरच्या राजकारणात वेगवेगळ्या नेतृत्वाचे वेगवेगळी राजकीय नीती बाळगणारे राजकारणी पाहिले.मात्र,राजकारण व समाजकारणातील सर्वगुणसंपन्न नेतृत्त्व म्हणून माहूरच्या राजकीय पटलावर लोकांची कामे पूर्ण करण्याचे एकमेव ध्येय व उद्दिष्ट उराशी बाळगून नगराध्यक्ष फिरोज दोसानी हे स्वतःला विकासकामात झोकून देत आहेत.त्यांचे इरादे एखाद्या डोंगरासारखे बुलंद व विराट आहेत म्हणूनच माहूर शहराचा विकास आज चोही बाजूंनी चौफेर असा होत आहे.*
___________________
:- *नाना लाड*
उपनगराध्यक्ष नपं,माहूर