धानोरा प्रथम आदिवासी सरपंचपदी मा. रज्जाक अमीर तडवी.

abhishek bakkewad
1 Min Read
Spread the love

चोपडा ता.प्रतिनिधी/

चोपडा: धानोरा येथील रिक्त झालेल्या संरपच पदाची निवड अत्यंत अटीतटीची होवुन त्यात संरपचपदी मा.रज्जाक अमीर तडवी यांनी अखेर बाजी मारली. दि. 10 सोमवारी दुपारी 2 वाजता ग्रामपंचायत कार्यालयात सरपंच पदासाठी रज्जाक अमीर तडवी तर अनिता मच्छिंद्र कोळी या दोन उमेदवारांनी फाॅर्म भरले व गुप्त मतदान घेण्याची मागणी करण्यात आली त्यात रज्जाक अमीर तडवी यांना आठ तर अनिता कोळी यांना सात मते मिळाली.म्हणुन रज्जाक अमीर तडवी यांना विजयी घोषित करण्यात आले. या प्रसंगी निवडून निर्णय अधिकारी जे. पी पाटील तर त्यांना ग्रामविकास अधिकारी विकास इंधे तलाठी खुशबू तडवी यांनी सहकार्य केले.

TAGGED:
Share This Article
error: Content is protected !!