हिमायतनगर ता.प्रतिनीधी/बाबाराव जरगेवाड
हिमायतनगर – आगामी होणाऱ्या लोकसभेसाठी काँग्रेस पक्षाकडून यवतमाळ जिल्ह्यातील उमरखेड तालुका अंतर्गत येणाऱ्या कुरूळी गावचे रहिवासी असलेले कैलास राठोड हिंगोली लोकसभेची उमेदवारी मिळावी यासाठी त्यांनी काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे, खासदार राहुल गांधी, खासदार के.सी. वेणी गोपालजी ( राष्ट्रीय सरचिटणीस काँग्रेस ) यांनी लेखी निवेदनाद्वारे दिनांक 5 रोजी एका लेखी निवेदनाद्वारे केली आहे.
मागील 2009 पासून काँग्रेस पक्षात सक्रिय असल्यामुळे व नांदेड येथे राठोड कोचिंग क्लासेस च्या माध्यमातून लाखो विद्यार्थ्यांना डॉक्टर,इंजिनिअर,तर नांदेड येथील स्वामी रामानंद तीर्थ विद्यापीठ वरती सिनेट प्रतिनिधी म्हणून निवड झाली होती त्यांच्या याच कार्याचा आढावा घेत दिनांक 23 11 2012 तत्कालीन राष्ट्रपती प्रणव जी मुखर्जी यांनी त्यांचा राष्ट्रपती भवनात त्यांचा सन्मानही करण्यात आला होता
हिंगोली लोकसभेमध्ये बंजारा समाजाचे चार लाखाहून अधिक मतदार आहेत तर ओबीसी समाज हा 70 टक्के असल्यामुळे या बाबीचा विचार करून उमेदवारी मिळावी अशी त्यांनी आपल्या निवेदनात म्हटले आहे यापूर्वी हिंगोली लोकसभेचे नेतृत्व उत्तम रावजी राठोड यांनी तीन वेळेस नेतृत्व केले तर इसवी सन 1990 नंतर 34 वर्षापासून काँग्रेस पक्षाशी बंजारा समाजाची नाळ जोडलेली असून येणाऱ्या 2024 च्या लोकसभेत बंजारा समाजास उमेदवारी मिळाल्यास हिंगोली लोकसभेसह परभणी,लातूर, बीड, यवतमाळ इत्यादी लोकसभेमध्ये बंजारा समाजाचे मतदार मोठ्या संख्येने असल्यामुळे याचा फायदा काँग्रेस पक्ष पक्षासाठी नक्कीच होणार असल्याचेही त्यांनी आपल्या निवेदनात नमूद केली आहे