महाशिवरात्रीनिमित्त चौधरी परिवाराच्या वतीने भजनसंध्या कार्यक्रम मोठ्या भक्तीमय वातावरणात संपन्न….! 

abhishek bakkewad
1 Min Read
Spread the love

नांदेड जिल्हा प्रतिनिधी अशोक वाघमारे 

नांदेड – नायगांव तालुक्यातील नरसी येथील बालाजी नगर मध्ये महाशिवरात्रीनिमित्त चौधरी परिवाराच्या वतीने भजनसंध्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते .महाशिवरात्रीच्या पावन पर्वावर भजनसंध्येला महिला, पुरुष, बालकासह भाविकांचा मोठा सहभाग होता.भगवान शंभू महादेवाची आराधना करत भव्य अशी पुजेची मांडणी करण्यात आली होती. शिवलिंग स्थापून पुजा आरती व रात्रभर भजन मोठ्या भक्तिभावाने संपन्न झाले. भजन संध्या कार्यक्रमाचे भजनी मंडळ गायक राजू महाराज कुंचेलीकर, शंकर महाराज डोनगावकर, व्यंकट पाटील सर, शिवानंद पाटील, ज्ञानेश्वर बैस, बिराजदार सर, गंगाबाई स्वामी, मृदंग वादक शिवाजी पाटील कुऱ्हाडे, हार्मोनियम वादक शिवानंद पाटील, मारोतराव कापसे, मारोती चौडे, मनोहर होनशेट्टे, कोटावार सर, श्याम चोंडे, शिवराज पाटील बामणीकर, आष्टे साहेब, दत्ता कोकणे, बालाजी पाटील सोरटे, बालाजी पेंटे, राजू वसमते, ज्ञानेश्वर भत्ते, सुभाष पाटील मुके, गजू महाराज भोपाळकर, संभाजी विभुते, श्रीनिवास मेटकर, महेश मोरेवार, मदन पाटील, अंबादास कोकणे,

अर्चनाताई स्वामी, जयश्रीताई स्वामी, सुनिता कापसे, नंदाताई कादमपुरे, चोंडे ताई, महादेवी ताई सोरटे, कल्पना डोलणारे, कोकणे ताई, पवळे ताई, संगीताताई कोटावार, वसमते ताई, होनशेटेताई,यांसह परिसरातील गायक, वादक, भाविक भक्त मोठ्या संख्येने उपस्थित होते. या कार्यक्रमाचे आयोजन सौ. सिंधूताई वैजनाथराव चौधरी नम्रताताई योगेश चौधरी यांनी केले होते तर आरती प्रसादानी भजनसंध्या कार्यक्रमाची सांगता करण्यात आली.

Share This Article
error: Content is protected !!