नुकसानग्रस्त शेतकऱ्याना त्वरित भरपाई मिळावी – युवानेते रवींद्र पा.चव्हाण
नांदेड जिल्हा प्रतिनिधी:संजीवकुमार गायकवाड
नांदेड :जिल्यातील धर्माबाद शहरा मधील रत्नाळी येथे रविवारी मध्यरात्री (ता.९) शेती औजार ठेवलेल्या शंकर गंगाराम जल्लोड (वय ४२) यांच्या कोठ्यास मध्यरात्री अचानक मोठी आग लागल्यामुळे या आगीत जवळपास 5 लक्ष 42 हजार किंमतीचे शेतीऔजार व घरगुती साहित्य या आगीत जळून खाक झाल्याची माहिती प्राप्त झाली आहे.
फिर्यादीनी दिलेल्या तक्रारीवरून अज्ञात इसमा विरुद्ध गुन्हा नोंदविण्यात आला
आहे.
या संदर्भातील सविस्तर वृत्त असे की,सध्या शेतीमध्ये बी – बियाणं लागवडीचे काम सुरु असून या शेती कामासाठी लागणारे शेतीऔजारे (तुषारचे पाईप) सुरक्षित रहावे म्हणून सुरेश पोतन्ना तोंडाकुरवाड,नागेश गंगाराम जल्लोड,गंगाधर उर्फ सायलु जल्लोड,लक्ष्मण गंगाराम जल्लोड,श्रीनिवास रामचंद्र मलेपिल्लू,नरेश गंगाधर जल्लोड,लक्ष्मण गंगाधर जल्लोड या सर्वांनी नागेश्वर जल्लोड,पोतन्ना चिनन्ना तोंडाकुलवाड यांच्या मालकीच्या कोठ्यात ठेवले होते.
मात्र रविवारी मध्यरात्री (ता.९) कोठ्यास अचानक आग लागून सर्व साहित्य जळून खाक झाले.
या आगीमध्ये शंकर गंगाराम जल्लोड यांच्या मालकीचे तुषार पाईप ६० नग (किमंत 36,000),सुरेश पोतन्ना तोंडाकुरवाड – ३०० नग (1,80,000) नागेश गंगाराम जल्लोड – ६० नग (किमंत 36000)
,गंगाधर उर्फ सायलु जल्लोड -६० नग (किमंत 36000), लक्ष्मण गंगाराम जल्लोड – ८० नग (किमंत 48000),
श्रीनिवास रामचंद्र मलेपिल्लू-१०० नग (60,000), नरेश गंगाधर जल्लोड -१०० नग (किमंत 60,000),लक्ष्मण गंगाधर जल्लोड – १०० नग (किमंत 60,000) असे एकूण 5, लक्ष 42 हजार रुपयांच्या किंमतीचे पाईप व
जळून भस्म झाले आहेत.
या शिवाय संजू दयारवाड यांची एलईडी टीव्ही,(किंमत 16,000)कपडे व अन्य साहित्य,गंगाधर जल्लोड यांची ५०० पेंडी ( किंमत 10,000)कडबा हे सर्व आगीची शिकार झाली आहे.
ही घटना कळताच गावकरी घटना स्थळावर जमा झाले परंतु आग ही आटोक्याबाहेर असल्यामुळे काही वाचविता आले नाही. मात्र यात कोणतीही जीवित हानी झाली नाही. ही आग कोणी तरी लावली असावी या शंकेवरून शंकर जल्लोड यांनी धर्माबाद पोलीस स्टेशन मध्ये फिर्याद दिली असून कलम ४३५ अंतर्गत अज्ञात इसमाविरुद्ध गुन्हा नोंदविण्यात आला आहे.
पुढील तपास हेड कॉनिस्टेबल विश्वबंर स्वामी हे करीत आहेत.
ही घटना कळताच काँगेसचे युवा नेते रवींद्र पाटील चव्हाण यांनी घटना स्थळाला भेट देऊन ज्यांचे नुकसान झाले त्यांना शासनाची सर्वोत्परी मदत मिळेल यासाठी प्रयत्न करू असे अश्वस्त केले आहे.
*चौकट*
घडलेली घटना दुर्दैवी आहे.अगदी शेती कामे तोंडावर आले असता इतके मोठे नुकसान शेतकऱ्यांना झेलावे लागत आहे.यात शासनाने लक्ष घालून नुकसानग्रस्ताना मदत तातडीने मदत करावी अशी मागणी होत आहे.