मुंबई : महाराष्ट्र राज्यात 50 हजार गृहरक्षक दलाचे जवान (होमगार्ड) आहेत आजपर्यंत होमगार्ड सैनिकांनी अनेक आंदोलने केली अनेक मोर्चे काढले अनेकदा गणेशोत्सव, नवरात्र व निवडणूक बंदोबस्त कामावर बहिष्कार टाकला परंतू याचा काहीच उपयोग झाला नाही होमगार्ड संघटनेची स्थापना महाराष्ट्र राज्यात झाली असून महाराष्ट्र सोडून इतर अनेक राज्यांत होमगार्ड सैनिक हे कायमस्वरूपी काम करतात आणि महाराष्ट्रातील होमगार्डला मात्र महाराष्ट्रातील कोणत्याही सरकारणे राज्यातील होमगार्डला न्याय देण्यासाठी पुढाकार घेतला नाही यामुळे आज होमगार्ड सैनिकांवर उपासमारीची वेळ आली आहे यामुळे महाराष्ट्र राज्यातील होमगार्ड हे येणाऱ्या सर्व निवडणुकांमध्ये मतदानावर बहिष्कार टाकण्याच्या तयारीत असल्याचे होमगार्ड सैनिकांतुन बोलल्या जात आहे. महाराष्ट्रात किमान 50 हजार होमगार्ड असुन एका होमगार्ड सैनिकां माघे त्यांच्या कुटुंबातील 05 मत धरल्यास अडीच लाख मत होणार तर होमगार्ड संघटनेच्या मागण्या पूर्ण नाही झाल्यास हे मतदानावर बहिष्कार टाकणार आहोत त्यांच्या सगेसोयरे नातेवाईक मित्र मंडळी यांचे मत बघितले तर किमान 10 लाख मत होतील तरी शासनाने यांच्या मागण्या पूर्ण करून कायमस्वरूपी काम रोजगार देऊन होमगार्ड सैनिकांना न्याय द्यावा नाही तर एवढ्या मोठ्या प्रमाणात मतदानावर बहिष्कार टाकल्यामुळे नक्कीच निवडणुकीत वेगळाच परिणाम होईल असे मत तज्ज्ञ मंडळी कडुन व्यक्त होत आहे.
होमगार्ड हे शासनाला वारंवार विनंती करूनही सरकार दुर्लक्ष करीत आहे. शासनाच्या खोट्या आश्वासनाला आम्ही कंटाळलो आहोत.त्यामुळे बहिष्कारास्त्राचे हत्यार उपसण्याच्या तयारीत असल्याचे होमगार्ड सांगत आहेत.विविध मागण्यांसाठी काही दिवसांपूर्वी होमगार्डनी मंत्रालयावर पायी मोर्चा काढला होता. मात्र, तो पुण्यात रोखण्यात आला होता. त्यावेळी गृहमंत्री सतेज पाटील यांनी मागण्या मान्य करण्याचे आश्वासन दिले होते. त्यामुळे मोर्चा स्थगित.करण्यात आला होता. गृहमंत्र्यांनी आश्वासन देऊनही, तसेच वारंवार विनंती करूनही सरकार मागण्यांकडे दुर्लक्ष करीत आहे. समस्या सोडवत नसल्याने होमगार्ड नाराज आहेत. शासनाच्या खोट्या आश्वासनाला ते कंटाळले आहेत.एकजूट करून येणाऱ्या निवडणूकीत मतदानावर बहिष्कार टाकण्याच्या निर्णयाप्रत होमगार्ड आले के आहेत. याची सरकारने नोंद घ्यावी असे मत होमगार्ड सैनिकांनी व्यक्त केले आहे.