मुदखेड प्रतिनिधी/ राहुल कोलते
मुदखेड : तालुक्यातील बारड येथील शिवाजी कनिष्ठ महाविद्यालय बारावी मध्ये शिक्षण घेणाऱ्या सपना सतीश पेदे रा.निवघा ता. मुदखेड या विद्यार्थिनीने सतत होणाऱ्या छेडछाडीतून विहिरीत उडी घेत आत्महत्या केल्यांची हृदय पिळवून टाकणारी घटना घडली असल्याने पालक वर्गात चिंतेचे वातावरण पसरले आहे.
बारड परिसरातील आजूबाजूच्या गावातील अनेक विद्यार्थिनी शालेय व महाविद्यालयीन शिक्षण घेण्यासाठी दररोज ये जा करावी लागते. ग्रामीण भागातील विशेषता सर्वसामान्य गरीब कुटुंबातील विद्यार्थिनींना शहरातील महागडे शिक्षण घेणे परवडत नाही. त्यामुळे ग्रामीण भागातील विद्यार्थी गावात राहून दररोज येणे जाणे करण्यासाठी सोयीचे असलेल्या शाळा व महाविद्यालयात प्रवेश घेत असतात. परिस्थिती इतकी भयावह आहे की काही पालक आपल्या मुलींना दररोज नेणे आणणे करतात तर काही विद्यार्थिनी पाय वाटेने जात असताना तेव्हा त्यांची छेड काढली जाते, शिट्ट्या मारणे, मोट
दुचाकी वरून आवाज देणे, त्यांच्या मागे पुढे दुचाकी फिरवणे, असे रोडरोमिओ करीत असतात. असे प्रकार रोजच घडत असतात. काही मुली घाबरून कोणालाही सांगत नाही. रोजच्या छेडछाडीला कंटाळून मयत मुलींच्या परिवाराने गाव पंचायतीकडे तक्रारही केली होती परंतु त्याकडे पंचायतीने दुर्लक्ष केल्याने आज मुलीला जीव गमवावा लागल्यांची दुर्दैवी घटना घडली असून कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.
यापूर्वी या भागात विद्यार्थिनीच्या छेडछाड प्रकारच्या अनेक घटना घडल्या आहेत. सुसंस्कृत कुटुंब या छेडछाडीला कंटाळून गाव सोडून शहरात आपल्या मुला मुलींना शिक्षण घेण्यासाठी स्थलांतरित झाले आहेत. परंतु गोरगरीब घरातील मुली मात्र आजही गावगुंड, उनाड व रोडरोमियोचे बळी पडत आहेत सपनाचे वडील सतीश पेदे यांनी या प्रकरणी जवाब नोंदविला असून छेडछाडीचे कारण सांगितले आहे तरी याप्रकरणी पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदविण्यात आला असून कठोर कारवाई करण्याची मागणी. बालाजी सूर्यतळे (मा. सभापती मुदखेड, जि.उपाध्यक्ष वंचित बहुजन आघाडी), प्रभाकर पवार (वंचित बहुजन आघाडी मुदखेड तालुका महासचिव) यांनी व समस्त गावकऱ्यांनी केली आहे. तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक संतोष केदासे करीत आहेत.