बौद्धभूमी परिसरातील घरात गॅस सिलिंडरचा स्फोट: रोख रक्कमेसह संसारोपयोगी साहित्य जळून खाक

abhishek bakkewad
3 Min Read
Spread the love

५ लाखांचे नुकसान स्फोटाचे कारण अस्पष्ट

माहूर तालुका प्रतिनिधी/विजयसिंह हजारी

माहूर  – शहरातील वार्ड क्रमांक ३ मधील बौद्धभूमी परिसरातील एका वयोवृद्ध दलीत महिलेच्या घरी स्वयंपाक चालू असताना अचानक गॅस सिलिंडरचा स्फोट होऊन लागलेल्या आगीत घरातील जिवनावश्यक वस्तू, अन्नधान्य,संसारोपयोगी साहित्य व कपाटात ठेवलेली अंदाजे रक्कम ४ लाख ५० हजार रुपये हे सर्व जळून खाक झाले.यात सर्व मिळून या महिलेचे जवळपास ५ लाखांचे नुकसान झाले आहे.ही घटना गुरुवार दिनांक २१ मार्च रोजी सकाळी ९:४५, वाजण्याच्या सुमारास घडली.विशेष म्हणजे काळ आला होता पण वेळ आली नव्हती या उक्तीची प्रचिती या घटनेतून बालंबाल बचावलेल्या महिलेस आली असून,आग लागली तेव्हा ती महिला बाहेर गेली होती असे तीचे म्हणने असल्याने आग नेमकी कशी लागली तिला सुद्धा माहीत नसल्याने आगीचे कारण अद्याप अस्पष्ट आहे.

 

आज गुरुवार २१ रोजी सकाळी साडेनऊ ते दहाच्या सुमारास शहरातील बौद्धभूमी परिसरातील आनंदाबाई उत्तम जाधव यांच्या विटमाती व टिनाचे छत असलेल्या घरास अचानकआग लागल्याची घटना घडल्याने परिसरात प्रचंड धावपळ उडाली.स्वयंपाक चालू असताना एच.पी कंपनीच्या गॅस सिलिंडरचा अचानकपणे स्फोट होऊन आग लागली असल्याचे सांगितले जात आहे.परंतू, गॅस सिलिंडरचा स्फोट नेमका कशामुळे झाला याविषयी कोणालाच माहिती नाही.विशेष म्हणजे स्वयंपाक चालू असताना सदरील आनंदाबाई नावाची ही महिला काहीवेळेसाठी खोलीच्या बाहेर गेली होती.त्यामुळे ती या घटनेतून बालंबाल बचावली.

आगीत महिलेच्या घरातील जिवनावश्यक वस्तू तसेच घरात साठवून ठेवलेले अन्नधान्य ज्यामध्ये डाळी,गहू, तांदूळ, लाकडी पलंग, लोखंडी कपाट(अलमारी) व यामध्ये ठेवलेली अंदाजी रक्कम रुपये ४ लक्ष ५० हजार हे सुद्धा जळून खाक झाले.

 

घटनेची माहिती नगरपंचायत प्रशासनाला मिळताच नगराध्यक्ष फिरोज दोसानी,मुख्याधिकारी डॉ.राजकुमार राठोड यांच्या सूचनेवरून कार्यालय अधीक्षक वैजनाथ स्वामी यांनी अभियंता विशाल ढोरे यांच्यासह स्वत: तातडीने अग्निशामक दलाच्या गाडीसह घटनास्थळी धाव घेतली.दिडतासाच्या अथक परिश्रमा नंतर अग्नीशामक दलाचे कर्मचारी गणेश जाधव,चालक मन्सूर शेख व प्रविण शेंडे यांनी परिसरातील उपस्थित नागरिकांच्या मदतीने भिषणरित्या भडकलेली आग आटोक्यात आणली अन्यथा एकमेकांना लागून असलेल्या इतर घरांना आगीने आपल्या विळख्यात घेतले असते.व अनर्थ घडला असता.आगीच्या घटनेची माहिती मिळताच तहसीलच्या आपत्तीव्यवस्थान विभागाच्या वतीने तलाठी चंद्रकांत बाबर यांनी आपल्या सहकारी कर्मचाऱ्यांसह घटनास्थळी धाव घेऊन घटनास्थळाची पाहनी करत नुकसानीचा पंचनामा केला.

नगरपंचायतचे आपत्ती व्यवस्थापन अग्निशामक दलाच्या जवानांच्या मदतीने कोणत्याही आपात्कालीन परिस्थितीमध्ये नागरिकांच्या सेवेसाठी चोवीस तास तत्पर असून, महसूल चे आपत्ती व्यवस्थापन सुद्धा शासकीय निममानुसार नुकसानीची अर्थीक मदत मिळवून देण्यासाठी प्रयत्न करत असते.आगीच्या अशा घटना घडल्याने पिडीताच्या संसाराची राखरांगोळी होते.त्यामुळे अशा घटना घडू नयेत म्हणून नागरिकांनीसुद्धा तेवढीच खबरदारी घ्यावी! असे आवाहन नगरपंचायत कार्यालय अधीक्षक वैजनाथ स्वामी यांनी शहरातील जनतेला वारंवार घडणाऱ्या आगीच्या घटनेच्या पार्श्वभूमीवर केले आहे.

TAGGED:
Share This Article
error: Content is protected !!