श्रीक्षेत्र माहूर: तालुक्यातील वाई बाजार येथे हिंदु बांधवांसाठी दफन व दहन विधी करण्यासाठी उभारण्यात आलेल्या स्मशानभूमीत येथील ग्राम पंचायत प्रशासनाने चक्क ट्रॅक्टरच्या सहाय्याने नांगरणी करुण सोबीन पेरल्याने विधीपूर्वक दफन केलेल्या मृतदेहाची विटंबना केल्याची घटना घडली होती.या बाबत अनेक वृत्त पञाच्या माध्यमातून बातम्या प्रकाशीत होताच त्या बातमीची दखल घेत आध्यात्मिक आघाडीचे जिल्हा अध्यक्ष योगी श्यामबापू भारती महाराज यांनी केली वाई बाजार येथील स्मशानभूमीची पाहणी केली.
तालुक्याच्या केंद्रस्थानी व सर्वात मोठी ग्राम पंचायत आणि बाजारपेठ असलेल्या वाई बाजार येथे हिंदू, मुस्लिम, बंजारा, बौद्ध ,आदिवासी समाज बहुसंख्य आहे. या ठिकाणी हिंदू धर्मांसाठी दहन व दफनभूमी तर मुस्लिम धर्मियांसाठी कब्रस्थान कार्यान्वित आहे. दोन्ही ही ठिकाणी शासनाच्या वतीने दहन व दफनभूमीसाठी (जनसुविधे योजनेअंतर्गत) लाखो रुपयांचा निधी शासनाने ग्रामपंचायत कार्यालयाला मंजूर करून प्रशासकीय मान्यता प्रदान करून या ठिकाणचा विकास केलेला आहे.असे असतांना येथील हिंदू बांधवांसाठी उभारण्यात अलेल्या स्मशानभूमीत स्थानिक ग्राम पंचायत प्रशासनाने चक्क ट्रॅक्टरच्या साह्याने नांगरणी करुण सोयाबीन पेरणी केली असल्याने विधीपूर्वक दफन केलेल्या मृतदेहाची विटंबना झाल्याचा प्रकार घडल्याने.
सदरील घटनेची अनेक वृत्त पञामध्ये बातमी प्रकाशित झाली.सदरील घटनेच्या बातमीची दखल घेत ता.११ जुलै रोजी भाजपाचे आध्यात्मिक आघाडीचे जिल्हा अध्यक्ष योगी श्यामबापू भारती महाराज यांनी सकाळी ११:३० वा वाई बाजार गाठून प्रत्यक्ष हिंदु स्मशानभूमित जावून पाहणी केली असता या ठिकाणी नांगरणी करुण सोयाबीन पिक उगवाल्याचे निर्देशात आले व विधीवत दफन केलेल्या मृत देहाची विटंबना झाल्याचे निदर्शनास आल्याने योगी श्यामबापू भारती महाराज यांनी कुठलाही विलंब न करता त्याच क्षणी संबंधीत ग्राम पंचायचे ग्राम विकास अधिकारी पी.जी. देवकांबळे यांना भ्रमनध्वनीच्या माध्यमातून संवाद साधण्याचा प्रयत्न केला.
परंतु देवकांबळे यांंनी फोन न घेतल्याने त्यांच्याशी संवाद होवू शकला नाही.तेव्हा येथील उपसरपंच उस्मान खान चांद खान पठाण यांच्याशी संवाद साधून घडलेल्या प्रकरणाची विचारणा केली असता उपसरपंच उस्मान खान यांनी रिकाम्या जागेत सोयाबीन पीक घेत असल्याचे सांगितले व उडवा उडविचे उत्तर देवून बोळवन करण्याचा प्रयत्न केला. त्यावेळी योगी श्यामबापू भारती महाराज हे चांगलेच तापले व उस्मान खान यांना धारेवर धरत दोन दिवसात स्मशानभूमित असलेले सोयाबीन पिक नष्ठ करा.कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण करण्याचा प्रयत्न करु नका अशी समज देत दोन दिवसात सोयाबीन पीक नष्ठ करण्याचा इशारा दिला.
या भागाचे कार्यसम्राट आमदार.भिमराव केराम यांनाही योगी श्यामबापू भारती महाराज यांनी भ्रमनध्वनीच्या माध्यमातून घडलेल्या प्रकाराची माहिती दिली. यावेळी गावातील अनेक हिंदु समाज बांधवांची उपस्थिती होती…